“विधानसभेकरिता जिल्ह्यातील ५६ उमेदवारांपैकी केवळ ७ लाडक्या बहिणी निवडणुकीच्या रिंगणात.”
‘शिदखेडा व धुळे शहर विधानसभा मतदारसंघात एकही लाडकी बहीण उमेदवार नाही.’
त-हाडी:- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचा बोलबाला सुरु असून जिल्ह्यातील शिरपूर शिंदखेडा साक्री , धुळे शहर व धुळे ग्रामीण या पाच विधानसभा मतदारसंघातून ५६ उमेदवारांपैकी केवळ ७ महिला निवडणुकीच्या रिंगणात आपले भाग्य अजमावीत आहेत.त्यात शिवसेना शिंदे एक गट तर्फे भारत आदिवासी एक, व पाच अपक्ष लाडक्या बहिणींचा समावेश आहे.विविध पक्ष आणि अपक्ष असलेल्या ४९ पुरुष उमेदवारांनी पाच विधानसभा क्षेत्रात आमदारकीचे स्वप्न उराशी ठेऊन उमेदवारी कायम ठेवली आहे. त्याच्या तुलनेत महिलांचा टक्का अतिशय नगण्य आहे.जिल्ह्यातील शिरपूर व धुळे ग्रामीण प्रत्येकी दोन. साक्री मतदारसंघात सर्वाधिक तीन लाडक्या बहिणी निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी शिंदखेडा व धुळे शहर मतदारसंघात एकही महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही.
यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.सद्या सर्वत्र त्यांचाच बोलबाला असल्याचे दिसून येत आहे.महिलांचा राजकारणातील टक्का वाढावा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.मात्र राज्याच्या निर्णय प्रक्रियेत जिल्ह्यातील ७ महिलांचा आकडा हा नगण्य असल्याचे चित्र या निवडणुकीत पहावयास मिळत आहे.महिलांनी सक्रिय राजकारणात यावे,म्हणून सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या नावाने राजकारण करतात.पण प्रत्यक्षात उमेदवारी देतांना हात आखडता घेत असतात.हेच या निवडणुकीतून पहायला मिळत आहे.या निवडणुकीत प्रमुख पक्षाच्या उमेदवारीत शिवसेना शिदे गट साक्रमधून आ.मजुळा गावित यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, शिरपूर मतदारसंघातून गिताजली कोळी अपक्ष , वर्षा वसावे अपक्ष तर धुळे ग्रामीण मधून सुनिता पाटील, अपक्ष मनिषा बिल भारत आदिवासी निवडणुकीच्या रिंगणात आपले भाग्य आजमावीत आहेत.
चौकट ;
“निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या लाडक्या बहिणी व त्यांचे पक्षनिहाय मतदारसंघ.”
मतदारसंघ उमेदवार पक्ष
•साक्री – मंजुळा तुळशीराम गावित (शिवसेना शिंदे गट)
मिरा बाबुलाल शिंदे अपक्ष
-वैशाली विश्वजीत राऊत – अपक्ष
•धुळे ग्रामीण -सुनिता सोपान पाटील – अपक्ष
-मनिषा अनिल भिल – भारत आदिवासी पक्ष
शिरपूर – वर्षा रमेश वसावे – अपक्ष
गिताजली शशिकांत कोळी – अपक्ष
———-
•शिदखेडा व धुळे शहर निरंक