टेंभूच्या सहाव्या टप्प्याचे श्रेय फक्त जयंत पाटील साहेबांनाचं – सचिन शिंदे
टेंभूच्या सहाव्या टप्पा आणि टेंभू विस्तारित योजनेचे श्रेय माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांनाच जाते. जयंत पाटील साहेबांनी कृष्णा लवादासमोर टेंभूच्या विस्तारित योजनेसाठी वंचित गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाटबंधारे चे अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन 81 टीएमसी शिल्लक पाण्यातून टेंभूसाठी 8 टीएमसी आणि म्हैसाळ योजनेसाठी 6 टीएमसी पाणी कसे उपलब्ध होऊ शकते हे पटवून सांगून या दोन योजनेसाठी 14 टीएमसी पाणी मंजूर केले.त्यामुळे खानापूर 12 गावे,आटपाडी 13 गावे, तासगाव 15 गावे आणि म्हैसाळ योजनेतील 45 गावे यांना पाणी उपलब्ध झाले.आणि या योजनेला गती मिळाली त्यामुळे टेंभूचे श्रेय जयंत पाटील साहेबांना जाते असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी सचिन शिंदे यांनी केले.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांच्या प्रचारार्थ बेनापूर, सुलतानगादे, बानूरगड , ताडाचीवाडी, हिवरे,पळशी करंजे येथील प्रचार सभेत बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले की, मी 2019 ला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. ज्या पार्टीत काम करायचे त्या पार्टीत निष्ठेने प्रामाणिकपणे काम करायचे हे माझे तत्त्व आहे. पक्षनिष्ठा महत्वाची आहे. पक्षाने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मी सज्ज आहे. मी बानूरगड, ताडाचीवाडी येथील पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणल्या. बेनापुर येथील सुद्धा 13 लाख रुपयाचा शुद्धीकरण प्रकल्प करता आला असता.
यावेळी राजेंद्र माने, एडवोकेट बाबासाहेब मुळीक, माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील, बबन गुरुजी हसबे,संजय जाधव, गोपीनाथ सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाला आनंदराव जंगम, रामचंद्र देसाई, चंदूआप्पा पाटील, अरविंद जाधव, शरद जाधव, भास्कर नाईक, भारत चंदनशिवे,दिनकर जाधव, अधिक हसबे,किरण हसबे, सुनील हसबे, विकास पाटील,गणेश हसबे,दिलीप हसबे,महादेव हसबे, प्रदीप हसबे,शरद देशपांडे, गोरख हसबे,संतोष सावंत, दिनकर कुंभार, प्रकाश हसबे,अजित काटकर,प्रताप हसबे,राजेंद्र हसबे, भगतसिंग पाटील, सुनील हसबे, शिवाजी माने,पोपट दुधाळ,अनिल माने, अशोक माने, भानदास सूर्यवंशी, तानाजी माने, कुमार वाघ,धोंडीराम माने, हणमंत माने,तुकाराम पाटील,माणिक सुडके,भागवत भारती, दादासो माने,मोतीराम पाटील, शिवाजी माने,विठ्ठल यादव,संभाजी माने, आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.