कर्तव्य समजून प्रत्येकाने मतदान करून इतरांनाही प्रोत्साहित करावे – डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे
त-हाडी – प्रतिनिधी
शिरपूर ०९ मतदार संघात विधानसभेकरीता दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. प्रत्येक व्यापारी, जेष्ठ नागरिक आणि नागरिकांनी आपले आद्यकर्तव्य समजून मतदान करून लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी शतप्रतिशत मतदान करावे, असे आवाहन डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे.
कै आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक व उच्च सायन्स कॉलेज हायस्कूल विद्यार्थ्यांना डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांनी मतदानाचे महत्व पटवून देत १०० टक्के मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. ते म्हणाले की, १०० टक्के मतदान करण्यासाठी शिरपूर व त-हाडी गावातील सर्व व्यापारी सामाजीक संस्था,आजी माजी व भावी , ग्रामपंचायत सदस्य,तालुका व ग्रामीण भागातील आजी-माजी व भावी ग्रामपंचायत सदस्य यांनी वार्डा-वार्डामध्ये त्या भागातील जास्तीत जास्त नागरीकांना मतदानासंबंधी जनजागृती करून १०० टक्के मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. मतदानाचे दिवशी आपण, आपला परिवार, मित्र परिवाराने सकाळी लवकर मतदान करावे. मतदान केल्यानंतर आपला, संपुर्ण परिवार व मित्रमंडळाचे फोटो शहरातील, गावातील विविध ग्रुपवर टाकावेत;
ज्यामुळे जे अद्याप मतदानासाठी घराबाहेर पडले नाहीत त्यांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ज्याचे मतदान राहिले त्यांना प्रत्यक्ष भेटून/फोनद्वारे विनंती करून मतदान आवश्य करून घ्यावे. मतदार व जेष्ठ नागरीकांना आवश्यक त्या सोई-सुविधा देवुन मतदान केंद्रापर्यंत नेऊन परत घरापर्यत पोहचवावे.असे आवाहन डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे सामाजिक कार्यकर्ते त-हाडी ता शिरपूर यांनी केले आहे.