कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान शिरुर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अँड. अशाेक पवार यांचा वाढदिवस अनाेख्या पध्दतीने साजरा !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: शिरुर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अँड. अशाेक पवार यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी केलेल्या अहवानाला प्रतिसाद देत माजी सभापती कृषी पशू संवर्धन, पुणे जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष रंजन भैय्या झांबरे व त्यांच्या पत्नी सौ श्रुतीकाताई झांबरे यांच्या वतीने शिरुर शहरांमध्ये 501 झाडांची रोपे, तुळस,प्राजक्ता,जाई,जुई, जास्वंद अशा अनेक प्रकारची रोपे वाटप करण्यात आली व पेढे देऊन नागरिकांचे तोड गोड करण्यात आले.
यावेळी शिरुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अध्यक्ष मुजफ्फरभाई कुरेशी, शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचे अध्यक्ष रविंद्रजी खांडरे वकिल, शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष रविंद्रजी ढोबळे, नगरसेवक संजयजी देशमुख, शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक अध्यक्ष राजुद्दिनभाई सय्यद, शिरुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सौदामिनी शेटे, शिरुर शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा सौ. तदनिकाताई कर्डिले, प्रविणराजे देशमुख,विजय चोरडिया, सागर भालेराव, सचिन अभंग, कौस्तुभ उबाळे, युवराज दसगुडे, अजिंक्य झांबरे,अक्षय झांबरे, ललिता चोरडिया, मृणालताई कर्डिले, स्नेहल झांबरे, कल्याणी झांबरे, पत्रकार बांधव नितिन बारवकर, अभिजित आंबेकर,संतोष शिंदे भगवान मंदीलकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.







