राष्ट्रीय पोषण अभियानात सर्व अंगणवाडयाचा सक्रिय सहभाग – डॉ भूमिका बेरगळ
आटपाडी तालुक्यामध्ये राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत एकात्मिक महिला व बालकल्याण सेवा योजना अंतर्गत सप्टेंबर महिना हा ‘पोषण माह’ म्हणून घोषित केला आहे.
1 सप्टेंबर पासून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचे अनुकरण प्रत्येक गावागावातील प्रत्येक अंगणवाडीतून व्हावे आणि केंद्राच्या पोषण अभियानात अधिकाधिक बालकांचा समावेश व्हावा.
यासाठी जनजागृती व्हावी असे आवाहन पंचायत समितीच्या माजी सभापती , सदस्य भूमिका बेरगळ यांनी केले.
केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात यावे असे निर्देश होते. त्यानुसार आटपाडी तालुक्यातील 243 अंगणवाड्यामध्ये योजना राबविली जात आहे.
बालकांमधील बुटकेपणा, कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्तक्षय म्हणजेच ऍनिमिया चे प्रमाण कमी करणे, अशी अनेक उद्दीष्ठे या अभियानाची आहेत.
याकरिता शाळांमध्ये चित्रफिती दाखविणे, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका यांनी एकत्रित गृहभेटी द्याव्या व मार्गदर्शन करावे तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या संदर्भातही मार्गदर्शन करावे
या अभियानाचा सर्व माता, बालक व किशोरवयीन मुलींना लाभ घेता यावा यासाठी सर्व गावातील सरपंच, ग्रामसेवक,लोकप्रतिनिधीनी अंगणवाडी ना भेटी द्यावेत तसेच सर्व अंगणवाड्या मध्ये पोषण आहारात दूध, अंडी, बटाटे, राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की, लाडू, ड्रायफ्रूट्स, इ,वाटप करता यावे. याकरिता लोकांनी सहभाग घ्यावा आव्हान माजी सभापती व पं. स.सदस्या भूमिका बेरगळ यांनी केली.







