• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

रेषांना बोलते केले चित्रकार निकेतन भालेराव यांनी सोहमच्या मंचावर

माणगंगा by माणगंगा
October 4, 2021
in पुणे
0
रेषांना बोलते केले चित्रकार निकेतन भालेराव यांनी सोहमच्या मंचावर

रेषांना बोलते केले चित्रकार निकेतन भालेराव यांनी सोहमच्या मंचावर

‘कला’ मग ती कुठलीही असो, कलाकाराचे प्रतिबिंब त्यात डोकावते .हस्तकला, चित्रकला, गायनकला ,वादनकला या कलाच अशा समृद्ध आहेत की त्या कलाकाराकडे बघून आपल्याला त्याची अनुभूती येते.

डॉ.मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी, मुंबई आयोजित चित्रकार व्यावसायिक संधी (पोट्रेट ,निसर्गचित्र, अमूर्त चित्र )या वेबिनार मध्ये मान. श्री. निकेतन भालेराव यांनी चित्रकलेचे कलाविश्व उलगडले.
चित्रकलेची सुरुवात कशी झाली?या क्षेत्रातले गुरु कोण? कोण कोणत्या चित्रपटात सहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून काम केले ?विद्यार्थ्यांना चित्रकार व्हायचे असेल तर काय तयारी करायला हवी ?या आणि अशा प्रश्नांच्या माध्यमातून चित्रकला हे करियर कशा प्रकारे होऊ शकते याची उद्बोधक माहिती निकेतन सरांनी दिली.सरांचे अनुभवविश्व इतके समृद्ध होते की त्यांना त्यांच्या चित्रकलेवर किती बोलू किती नको असे झाले होते.

कलाकाराची पहिली ओळख त्याच्या कलाकृतीतून होण्यासारखा दुसरा आनंद नसतो. व्यक्तीची थेट ओळख होण्यापूर्वी तिच्या अदाकारीचा परिचय झाला, तर त्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे कंगोरे हळूहळू लक्षात येऊ लागतात. ती व्यक्ती जर चित्रकार असेल तर त्याच्या रेषा आणि रंग आधी बोलतात आणि मग ती व्यक्ती आपल्या मन:चक्षूंसमोर आकार घेऊ लागते.
रंगविलेल्या आकारांतून साधलेली कलाकृती म्हणजे चित्र, अशी चित्राची सर्वसामान्य व्याख्या करता येते.

मुळातच सोहम अकादमीने नावीन्याचा ध्यास घेत विविध कार्यक्रम घेतले आहेत .’चित्रकला व करियर’ असा वेगळा विषय घेऊन त्यावर वेबिनार आयोजित करून डॉ.मीनल मॅडमने विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव दिला.ज्या प्रतिभावंत चित्रकारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवले,त्या श्री. वासुदेव कामत,श्री.गाढवे,श्री.जोशीया गुरूंचा उल्लेख करायला विसरले नाहीत.

या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीम .समीक्षा तावडे यांनी केले असून त्यांना श्रीम.प्रीती उरणकर, श्रीम.प्रिया उपासनी यांचे सहकार्य लाभले ,तर तंत्रस्नेही गायत्री मॅडमचे विशेष योगदान लाभले.

विद्यार्थ्यांना चित्रकलेकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन दिल्याबद्दल सर्वांनी सोहम परिवाराचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Views: 153
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
प्रवीण शीलवंत यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार.

प्रवीण शीलवंत यांना 'आदर्श शिक्षक' पुरस्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)