सांगली जिल्ह्यातील आटपाडी चे सुपुत्र कमांडोर सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाई दलातील कामगिरीबद्दल राष्ट्रपतींनी प्रजासत्ताकदिनी विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते . दिल्ली येथे हवाईदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हवाई दल प्रमुख व्ही .आर .चौधरी यांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले .
अभिनंदन!! त्रिवार अभिनंदन !!!माझा माजी विद्यार्थी श्री. सुहास प्रभाकर भंडारे यांनी हवाई दलात उल्लेखनीय कामगिरी करून राष्ट्रपती पारितोषिक मानांकन प्राप्त केल्याबद्दल माझ्याकडून त्यांना मनःपूर्वक आशीर्वाद व भविष्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा कमल कुलकर्णी (जोशी) मॅडम, माजी राजाराम बापू हायस्कूल आटपाडी. (सध्या वास्तव्य पुणे .)







