‘ध्येयदिशा पेरणी’ प्रतिष्ठानकडून शेटफळे आरोग्य उपकेंद्रास संगणक संच भेट…
'ध्येयदिशा पेरणी' प्रतिष्ठान,च्या वतीने मा. श्री.सचिन मुळीक (तहसीलदार आटपाडी )यांच्या शुभ हस्ते शेटफळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास संगणक संच भेट देण्यात आला.या प्रसंगी बोलताना श्री मुळीक म्हणाले. प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत अल्पावधीत केलेले समाज उपयोगी कार्य कौतुकास्पद आहे. सध्याचे युग संगणक युग असल्याने शासनाच्या सर्व विभागातून ऑनलाइन काम अपेक्षित आहे. संगणकामुळे आरोग्य उपकेंद्राच्या कामास गती येईल. उपकेंद्र व ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात सुरू केलेल्या मिनी कोव्हिड सेंटरचे काम उल्लेखनीय असून जेवढ्या गतीने पाॅझिटिव्हिटी वाढली तेवढ्याच गतीने अल्पावधित कमी ही झाली. डाॅ.सुरेखा देशमुख यांनी कोरोना' च्या दुसर्या लाटेत फेब्रुवारी ते आज अखेर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कार्य व गावकर्यांनी कलेल्या सहकार्याची माहिती दिली.बाबूराव गायकवाड यांनी ' कोरोना बाधित कालावधीतील ॲडमिट व क्वारंटाईनचे अनुभव कथन केले.
याप्रसंगी प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डाॅ. सुरेखा देशमुख, आरोग्य सेवक नानासाहेब चवरे व आशा वर्करांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
मान्यवरांचे स्वागत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनिल गायकवाड सर तर आभार विजय देवकर यांनी मानले.
शासनाच्या सर्व नियमाचे (मास्क, सॅनिटाईजर व सामाजिक अंतर ) पालन करुन कार्यक्रम पार पडला.यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष संभाजीराव गायकवाड, पदाधिकारी संजय गायकवाड, दत्तात्रय कांबळे, उपसरपंच निवृत्ती गायकवाड, प्रा.चंद्रकात गायकवाड, सोमनाथ गायकवाड, आबासाहेब ननवरे, किसन गायकवाड गुरूजी, अशोक गायकवाड, गौरिहर पवार,पत्रकार नागेश गायकवाड, पत्रकार तानाजी गायकवाड, रविंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमारे, विलास गायकवाड (बाबा) प्रा. समाधान गायकवाड, सतिश गायकवाड, पांडुरंग गायकवाड, एस.एस.गायकवाड सर, प्रकाश गायकवाड साहेब, कर्ण दबडे, शिवलिंग बिराजदार, नारायण गायकवाड, सुनील गायकवाड, विजय गायकवाड, दगडू तात्या,आलम कांबळे,अमित गायकवाड, सिध्दार्थ भोरे व प्रतिष्ठानचे इतर सर्व सक्रीय सदस्य उपस्थित होते.