पुणे – सासवड मार्गावर ठिकठिकाणी खड्डे ,सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी
पुणे : (प्रतिनिधी )
पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्या मार्गांपैकी एक असणार्या
सासवड- बोपदेव घाट – कोंढवा मार्गारिल रस्त्यावर ठिकठिकाणी खडडे पडले आहेत ,यामुळे दररोज ये – जा करणार्या हजारो वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे .सासवड वरुन पुणे शहराकडे जाताना शारदा लाॅन्स ते कोडीत नाक्यावरिल पेट्रोल पंप ,हिवरे गावातील तीव्र वळणावर तसेच एक किलोमीटर अंतरापर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावर खडडे पडले आहेत.
दररोज सासवड ते पुणे प्रवास करणारे वाहनचालक व या मार्गावरिल हिवरे ,चांबळी ,बोपगाव , भिवरी गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.काञज तसेच स्वारगेट पी.एम.पी एम.एल आगारातुन सासवड साठी पी.एम.पी बसेस सुरु आहेत.
ठिकठिकाणी असलेल्या खडड्यांमुळे दुचाकी ,खासगी बसेस ,दुधगाड्या , चारचाकी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या मार्गावर ठराविक दिवसानंतर रस्ता दुरुस्ती व देखभालीकडे लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांमधुन होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग ठिकठिकाणी असलेले खडडे बुजवुन त्यावर डांबरीकरण केव्हा करणार ? की एखादा भीषण अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार असा सवाल नागरिकांमधुन विचारला जात आहे.







