येरवडा भव्य आरोग्य शिबीर संपन्न
पुणे
सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान येरवडा
लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज लायन्स क्लब ऑफ पुणे रॉयल, लायन्स क्लब ऑफ पुणे विमाननगर व शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल रास्ता पेठ पुणे तसेच समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी, पल्स, बी पी, शुगर महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, मधुमेह तपासणी, बोन्स कॅल्शिअम मशीन द्वारे तपासणी व मोफत औषधे व चष्मे वाटप असे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरास नागपूर चाळ येरवडा या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 387पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्थानिक आमदार मा. श्री सुनील अण्णा टिंगरे, ला. नरेश राठी जीएसटी कॉर्डिनेटर, अॅड नानासाहेब नलावडे, बुद्धम् खरात व राजकुमार बाफना.ला विठ्ठलराव वरुडे पाटील (अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज) एलसीपी विमान नगर अध्यक्ष ला. राहुल फडतरे, एलसीपी रॉयल ला. मनोहर माकम, ला. सुनील सुखात्मे व सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ उज्वला गायकवाड मॅडम, एलसीपी कात्रज चे सेक्रेटरी लायन सतीश कदम, लायन सचिन मुळे, लायन भानुदास पायगुडे व सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक संस्थेच्या
खजिनदार..प्रजावती गायकवाड
स्वयंसेवक.. प्रशांत गायकवाड,
प्रमोद पंचमुख,
उमेश ओझा, राकेश मर्चंड
कनिष्क गायकवाड, आशा पवार, सुवर्णा सोनार
या सर्वानी मदत केली प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.







