• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

सादिक खाटीक यांना महामंडळावर संधी द्या .सुमित्र माडगूळकर यांची शरद पवारांकडे मागणी .

माणगंगा by माणगंगा
October 27, 2021
in पुणे
0
सादिक खाटीक यांना महामंडळावर संधी द्या .सुमित्र माडगूळकर यांची शरद पवारांकडे मागणी .

सादिक खाटीक यांना महामंडळावर संधी द्या .

सुमित्र माडगूळकर यांची शरद पवारांकडे मागणी .

________________________


पुणे दि. २७ (प्रतिनिधी )


सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे सर्वस्पर्शी, सर्वप्रिय व्यक्तीमत्व सादिक पापामियाँ खाटीक यांना महामंडळावर संधी द्या, अशी मागणी ग . दि . माडगुळकर – व्यंकटेश माडगुळकर यांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर पुणे यांनी राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे .
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे यांना ही याबाबतचा ईमेल पाठविण्यात आला आहे .


माणदेशी आटपाडीचे चतुरस्त्र ,अष्टपैलू पत्रकार, कला, क्रीडा, सांस्कृतीक, साहित्य इत्यादी अनेक क्षेत्रात ३८ वर्षापासून कार्यरत असणारे व्यक्तीमत्व म्हणजे सादिक पापामियाँ खाटीक हे होत .असे स्पष्ट करून सुमित्र माडगूळकर यांनी , सादिक खाटीक यांनी ३२ वर्षे गाजविलेली पत्रकारीता, पत्रकारीतेतील अनेक राज्यस्तरीय पुरस्कार, माणपत्राने झालेला त्यांचा गौरव, आकाशवाणी सांगली वरून सादर केलेली असंख्य विकासपत्रे, त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने , एबीपी माझा मराठी न्युज चॅनेल मुंबईचे संपादक राजीव खांडेकर, ग्राहक संरक्षण न्यायालयाचे माजी न्यायाधीश ॲड.एम.डी .देशमुख , अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष, दै . तरुण भारत बेळगांव – सांगलीचे सहसंपादक श्री . शिवराज काटकर, दिवंगत माजी आमदार ॲड. जयंत सोहनी, माजी प्राचार्य डॉ . श्रीपाद जोशी, शिक्षक नेत्या डॉ . स्वाती शिंदे – पवार इत्यादी राज्यातील १६ मान्यवरांनी खास लेख प्रसिद्ध करून सादिक खाटीक यांचा मुक्त कंठाने केलेला गौरव सादिक खाटीक यांच्या जिंदादिल व्यक्तीमत्वाची साक्ष देतो . असे या ईमेल मध्ये म्हटले आहे .
सुमित्र माडगूळकर आपल्या ईमेल मध्ये पुढे म्हणतात, माडगूळकर परिवार, शंकरराव खरात, ना .सं. इनामदार ,बॅरिस्टर आप्पासाहेब पंत वगैरे माणदेशीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सादिक खाटीक यांनी साहित्य संमेलने, कवी संमेलने ,व्याख्यानमाला, कथाकथन स्पर्धा, जयंती, पुण्यतिथी च्या निमित्ताने विविध उपक्रमातून या साहित्यीक रत्नांचा सतत जागर केला आहे . थोर साहित्यीक रा . चिं .ढेरे यांच्या “शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव “. या संदर्भ ग्रंथात सादिक खाटीक यांच्या लिखाणाचा अनेक ठिकाणी आलेला संदर्भ, शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक , खासदार संजय राऊत यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर महोदयांकडून घेतली जाणारी ह्दयस्पर्शी दखल हीच या गरीबाची ( सादिक खाटीक ) आयुष्याची कमाई आहे . गत ४० वर्षापासून गंजलेल्या ,गळक्या पत्र्यात राहणाऱ्या सादिक खाटीक आणि त्यांच्या परिवाराने आज अखेर स्वाभीमानाने जीवन कंठले आहे .
एस .टी . महामंडळ, पर्यटन महामंडळ, कृष्णा खोरे महामंडळ, वीज महामंडळ वगैरे पैकी कोणत्याही शक्तीशाली महामंडळावर सादिक खाटीक यांना संधी दिल्यास, उपेक्षित आटपाडी तालुक्याचा आणि माणदेशाचा गौरव होवू शकतो. काही गावांचा अपवाद वगळल्यास संपूर्ण भारतभर सर्व गावात आढळणाऱ्या सर्व धर्मीय खाटीक बांधवांचा गौरव होवू शकतो . मुस्लीम,ख्रिश्चन, जैन, पारशी, बौद्ध, शीख ,ज्यू या अल्पसंख्याक समाजा बरोबर राज्यातील ओबीसी, अलुतेदार – बलुतेदार घटकांसह अंध, अंपग, युवक, माता भगिनी बहुजन वर्गास मोठा आनंद होवू शकतो . शेतीच्या पाण्यासाठी सतत लिखाण, भाषणे, आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी वर्गास न्याय मिळवून देण्यात आयूष्य खर्ची घातल्याने शेतकरी कष्टकरी वर्गासही सादिक खाटीक यांच्या रूपाने न्याय मिळू शकतो . साहित्य,कला, क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रात ही त्यांच्या निवडीने अत्यानंद होवू शकतो . या सर्व गोष्टींचा विचार करून सादिक खाटीक यांच्या रूपाने आटपाडी तालुक्याचा गौरव करावा . अशीही विनंती या ईमेल द्वारे सुमित्र माडगुळकर यांनी शेवटी केली आहे .

Views: 735
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा म्हणजे एम.पी. एस. सी. व यु.पी.एस. सी. पायामुळेच…नायब तहसीलदार  सिताकांत शिर्के….

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा म्हणजे एम.पी. एस. सी. व यु.पी.एस. सी. पायामुळेच…नायब तहसीलदार सिताकांत शिर्के….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)