सुन्नी बैतुलमाल , पुसद च्या वतीने मोफत हिजामा थेरीपी कैम्प चे आयोजन…
पुसद :- पुसद तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी सुन्नी बैतुलमाल पुसद च्या वतीने आज रोजी मोफत हिजामा थेरीपी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते
या कैम्प चे उलमा अहेलै सुन्नत यांच्या वतीने उद्घाटन करण्यात आला
हे कार्यक्रम मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून करण्यात आले होते मुस्लिम धर्माचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांनी त्यांच्या कार्यकाळात हिजामा थेरेपी ला अधिक महत्व प्राप्त करून दिले होते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हिजामा थेरेपी केल्याने शरीरातील अनेक आजारावर मात करता येते हे महत्त्व लक्षात घेऊन सुन्नी बैतुलमाल , पुसद च्या वतीने मोफत हिजामा थेरेपी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या आयोजन दरम्यान पुसद नपचे माजी उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीम , शेख कय्युम शहराध्यक्ष रॉ.कॉ. पार्टी यांनी भेंट दिली व सुन्नी बैतुलमाल हे समाजिक कार्यात अग्रेसर राहते म्हणून एम.आय.एम पक्ष पुसद च्या वतीने सुन्नी बैतुलमाल पुसदला सन्मानचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आला आहे , या शिबीर मध्ये २५० च्या जवळ पास नागरिकांनी मोफत हिजामा थेरेपी कॅम्पचा लाभ घेतला
मोफत हिजामा थेरेपी कॅम्प मध्ये डॉ. शहजाद अकोला , डॉ सोहेल पुसद , डॉ सैफुल इस्लाम पुसद यांनी या कॅम्प चे कामकाज पाहिले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी मोहम्मद अतीक रिज़वी , हकीमोद्दीन , वसीम निर्बान , मोईन खतीब , मोबिन खान , सै महफूज , अनीस अहमद , सैय्यद सिराज , समीर काज़ी , सलमान , साबिर , आरिफ कुरेशी , इस्माइल , आसिफ , शैख शेरू ,साजिद यांनी केला आहे…