आज वाझर मध्ये कॉ.बळवंतराव शिरतोडे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार वितरण सोहळा.
उल्का महाजन,भाई संपतराव पवार, पुरस्काराचे मानकरी
आमदार अरुण लाड,डॉ.शैला दाभोळकर,ॲड.मुक्ता दाभोळकर यांचेसह अनेक मान्यवर वाझरमध्ये होणार दाखल….
‘श्रमिकाची पाऊलवाट पुस्तकाचे होणार प्रकाशन
समाज परिवर्तनासाठी चा लढा हा खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यातून वाढला पाहिजे.सर्वसामान्य जनतेला सर्वच बाबतीत सजग केले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून येरळा काठावरील वाझर सारख्या खेडेगावात विद्यार्थी दशेपासून समाजपरिवर्तनासाठी चे विविध उपक्रम राबवणारे सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी आपल्या वडिलांच्या व आईच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी राबणाऱ्या, घाम गाळणाऱ्या श्रमिक,कष्टकरी,शेतकरी,कामगार माणसांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्रातील नामांकित कार्यकर्त्यांना, नेत्यांना दरवर्षी कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार व कॉम्रेड गिताबाई शिरतोडे कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा व जाहीर परिसंवादातून प्रबोधनाचा जागर हा अनोखा उपक्रम गेली दहा वर्षे सुरू ठेवलेला आहे. आज रविवारी 14 नोव्हेंबर 2021 ला या कॉ.गिताबाई शिरतोडे करत्रुत्ववान महिला सन्मान पुरस्काराचे वितरण आदिवासी समाजातील कातकरी महिलांच्या प्रश्नावरील लढ्यात, रायगड जिल्ह्यातील सेझविरोधी लढ्यात काम करणाऱ्या कॉ.उल्का महाजन यांना तर श्रमप्रतिष्ठा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रात अत्यंत उच्च दर्जाचे काम केलेले भाई संपतराव पवार, यांना प्रदान केला जाणार आहे.पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार अरुण लाड, पुरोगामी विचारवंत प्रा.डॉ. बाबुराव गुरव,व्ही्.वाय.( आबा) पाटील शहीद डॉ.. नरेद्र दाभोळकर यांच्या पत्नी शैला दाभोळकर,अंनिस च्या नेत्या मुक्ता दाभोळकर यांचे सह अनेक मान्यवर वाझर मध्ये येत आहेत. श्रमप्रतिष्ठा पुरस्कार वितरण सोहळा व कष्टकर्यापुढील आव्हाने या विषयावर जाहीर परिसंवादात सहभागी होत आहेत. अशा समाज परिवर्तन चळवळीच्या दिशादर्शक सोहळ्यास संपूर्ण सांगली जिल्ह्यातून,जिल्हा बाहेरून अनेक संघटनांचे प्रतिनिधी ,सामाजिक कार्यकर्ते ही येत आहेत.तसेच रात्री आठ वाजता झी टॉकीज फेम किर्तनकार अविनाश भारती यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक मारुती शिरतोडे,हिम्मतराव मलमे यांनी दिली.