खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्याध्यक्ष श्री.नितीनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून माण तालुक्यातील दहिवडी शहरातील राजे प्रतिष्ठाण व खा.छ.श्री.उदयनराजे भोसले यांचा चाहतावर्ग पाहता माण तालुक्यातील राजे प्रतिष्ठाणच्या निवडी जाहीर केल्या तसेच यावेळी दहिवडी शहर अध्यक्ष पदी पै.अक्षय तुपे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी श्री.शिंदे म्हणाले,माण तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्यासाठी राजे प्रतिष्ठान प्रयत्नशील राहील व सर्व सामाजिक उपक्रमात प्रतिष्ठान अग्रेसर व कोणत्याही परिस्थितीत प्रतिष्ठाण पाठीशी राहील असे आश्वासन दिले.
यावेळी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे,दहिवडीचे माजी नगराध्यक्ष सिध्दार्थ गुंडगे,मावळचे नगरसेवक संजय घुले,नितीन येवले,अजिम पठाण,गणेश गोरे,अॅड.सौरभ ढोक,धिरेनकुमार भोसले,लखन पाटोळे,वैभव वसव,पै.संजय ढवाण,अमित जाधव,कैलास दडस,रोहीत खरात,आकाश जाधव,मयुर तुपे,वरुण गोसावी,पै.प्रथमेश शिंदे,लादेन चव्हाण,राम बोडरे,अभिषेक ओंबासे यांनी प्रत्यक्ष घेऊन शुभेच्छा दिल्या.







