गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्याबाबत कृषी विभागाचे आवाहन .
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पी पाटील यांनी केले आहे. यामध्ये 10 ते 75 वर्ष वयोगटातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य पती/पत्नी, मुलगा अविवाहित मुलगी, सून इत्यादींचा अपघाती मृत्यू झाल्यास झाल्यास 2 लाख रुपये व कायमचे अपंगत्व आल्यास अपंगाच्या स्वरूपानुसार 1 ते 2 लाख रुपये विमा संरक्षण मिळते.
यासाठी शेतकरी कुटुंबातील सदस्याच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. योजना कालावधी 7 एप्रिल 2021 ते 6 एप्रिल 2022 आहे.या कालावधीत ज्या कुटुंबातील अपघात झाले असतील अशा शेतक-यांनी 45 दिवसाच्या आत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रस्ताव सादर करावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पी पी पाटील यांनी केले आहे.
अनेक वेळा सर्व नियम अटी मध्ये शेतकरी बसत असून सुद्धा त्यांचे प्रस्ताव कार्यालयाकडे येत नाहीत त्यामुळे त्यांना विमा योजनेचा लाभ देण्यास अडचण होत आहे .त्यासाठी ग्रामस्तरीय समितीने अपघात विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची गरज आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी एस .व्ही. लोखंडे,कृषी पर्यवेक्षक के. एस .घोडके, कृषी सहायक संजय काळेल, रामदास ढवळे,सागर ठोंबरे,ए एन म्हेत्रे,एस. व्ही .शिंदे, एम .एस .धर्मासाले उपस्थित होते.