उद्योगपती रामदास माने यांना मातृशोक
म्हसवड : श्रीमती माणिकाबाई मानसिंग माने ( वय ८५) यांचे सोमवारी रात्री दहा वाजता लोधवडे ( ता. माण) येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.प्रसिध्द उद्योगपती रामदास माने यांच्या या मातोश्री होत. आज सकाळी लोधवडे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. तिसरा सावडणे कार्यक्रम गुरुवारी(दि. ६) सकाळी साडेआठ वाजता लोधवडे येथे होईल.







