ऊसतोड मजुरांच्या सोबत स्वातीताई मोराळे यांनी साजरी केली संक्रांत.
पुणे:
प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी ओबीसी फाऊंडेशन इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्वातीताई मोराळे यांनी आपली संक्रात ऊसतोड महिला मजुरांच्या सोबत साजरी केली. सलग सातव्या वर्षी त्यांनी साखर कारखान्याच्या कोपीवार व ऊसाच्या फडात जाऊन महिला बरोबर संक्रात साजरी केली. नियमितपणे सात वर्षं ही परंपरा जपली आहे, यावर्षी भोगीच्या दिवशी माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती येथे साजरी केली व संक्रांती दिवशी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कासारसाई ता. मुळशी जि. पुणे येथे खूप थाटामाटात साजरी केली.
स्व. गोपिनाथराव मुंडेसाहेब सतत या कष्टकरी ऊसतोड मजुरांच्या सोबत रहात असत याचीच प्रेरणा घेऊन मी त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले. याचाच भाग म्हणून गेली सात वर्षे महाराष्ट्रातील विविध कारखान्यावर जाऊन महिला बरोबर संक्रात साजरी करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबवत आहेत . यावेळी महिलांना साड्या, लहान मुलांना कपडे, पुरुषांना ब्लँकेट वाटली जातात.
तसेच आरोग्य शिबिर घेऊन त्याप्रमाणे त्याना गोळ्या औषधांची वाटप करणे, आरोघ्याची काळजी कशी घ्यावी यासाठी प्रबोधन करणे, महिलांना सॅनेटरी नॅपकिन वाटप करणे असे उपक्रम राबविले जातात. त्यांचे विम्याचे प्रश्न सोडवणे. कोपीवर टॉयलेट, बाथरूम उपलब्ध करून देण्यासाठी चा लढा, आम्ही यशस्वीपणे राबवला असे उपक्रम राबविले जात आहेत. कोरोना काळात त्यांना किराणा वाटप करणे, पास काढून देऊन त्यांना गावापर्यंत पोहच करणे यासारखी मदत आम्ही सतत करत आलोत, त्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी खम्बीर पणे उभं राहण्याच काम वेळोवेळी करण्यात आलं, स्थानिक लोकांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका करणे अशी कामे ओबीसी फाऊंडेशन इंडिया व वेध फाऊंडेशन यांच्या मार्फत करण्यात येत आहेत. यावेळी संघटनेचे जयश्री मुंढे, मनीषा चौधर ,गजानन सोनुने, शैला वायभासे, नितिनबीचकुले ,विनोद मुंढे, देवदत्त उगले, राजू सानप शिवजी वाघ, जयदीप बुरंगुले,हे उपस्थित होते.तसेच ज्यांच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहचवू शकलो अशा मा. वैशाली चाटे, मा. संजीवनी आघाव, मा. बंडु चौरे, मा.अर्चना आघाव, मा.शैला दराडे मा. अजित लकडे पोलिस निरीक्षक यांच्या सहकार्यातून केले.
त्यांचे बिशेष आभार
ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर हसू ,मला नेहमी काम करण्यासाठी प्रेरणा देत असतात,ऊसतोड कामगार मुलांच्या शैक्षणिक समस्या या विषयावर माझी पीएचडी चालू आहे, त्यामुळे त्यांच्या समस्याच्या खोलापर्यंत मलाजाताआलेअशी माहिती त्यांनी दिली.