• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

मायणी येथे शिवजयंती उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
February 21, 2022
in सातारा जिल्हा
0
मायणी येथे शिवजयंती उत्साहात संपन्न

मायणी येथे शिवजयंती उत्साहात संपन्न

मायणी:-सतीश डोंगरे

              संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मायणी याठिकाणी सर्वत्र भगवेमय वातावरणात विविध ठिकाणी अनेक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. कोरोनामुळे दोन वर्षांपासून साध्यापध्दतीने साजरा होणारी शिवजयंती यंदा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

             मायणी प्राथमिक शाळेत रक्तदान व ऑनलाईन दाखल्यांचा कार्यक्रम

             मायणी येथील प्राथमिक शाळेत महा ई सेवा केंद्र व आपले सरकार या ऑनलाईन दाखले व इतर सुविधा देणाऱ्या समूहाने राबवलेल्या उपक्रमात रक्तदान ,कोविड लसीकरण व इतर सुविधा उपलब्ध होत्या. यात १८ लोकांनी रक्तदान १८ केले. इ श्रम कार्ड १८५,इतर सर्टिफिकेट ६५ लोकांनी याचा लाभ घेताना. शिवजयंती निम्मित राबविण्यात आलेल्या अनोख्या बद्दल संजय क्षीरसागर,मनोज कुंभार,प्रवीण जाधव,प्रदीप जाधव,राहुल कांबळे,सागर भोंगाळे,अनुप शिंदे,रोहित पाटोळे,योगेश बारशींगे,समर्थ तारळेकर,सुमित तारळेकर यांचे गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले.

             मायणी मेडिकल कॉलेज शिवजयंती मान्यवरांचा सन्मान

         मायणी मेडिकल कॉलेज याठिकाणी सालाबादप्रमाणे अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून छ. शिवरायांच्या विचाराचा वारसा जोपासताना संपूर्ण जगभरात थैमान घालून जगाला भीतीच्या छायेखाली आणणाऱ्या कोरोना महामारीत रुग्णांना आधार देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात आपले कर्तव्य बजावताना जीवाची बाजी लावणाऱ्या मायणी येथील डॉक्टर व जगभरातील घडामोडी तसेच मायणी परिसरातील कोविड तसेच इतर घटनांचे वार्तांकन करताना आपले समाज भाग ठेऊन सामाजिक मदतीची चळवळ उभा करणाऱ्या पत्रकार मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. 

         यावेळी कार्यक्रमास छत्रपती एज्युकेशन मेडिकल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.एम आर देशमुख, माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर, हरणाई सूतगिरणीचे रणजितभैय्या देशमुख, सातारा जिल्हा बँक उपाध्यक्ष अनिल देसाई,युवानेते सचिन गुदगे, खटाव माण ॲग्रो साखर कारखान्याच्या संचालिका प्रितीताई घार्गे,पत्रकार प्रशांत जाधव,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ महेश साळुंखे,डॉ.शशिकांत कुंभार,डॉ.एस एन पवार ,अप्पासाहेब देशमुख,दिपकदादा देशमुख,जेष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके,प्रकाश सुरमुख, पोपट मिंड, पांडुरंग तारळेकर,माजी प्राचार्य आर्गुने,संचालक गणेश भिसे,सचिन देशमुख, संदीप देशमुख, विशाल देशमुख, जालिंदर माळी, कालिदास पवार ,प्राचार्य प्रगती पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख, सुयोग देशमुख डॉ.विकास देशमुख, डॉ.मकरंद तोरो,डॉ.दत्तात्रेय तांबवेकर, फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष महेश पुस्तके आदी मान्यवर  उपस्थित होते.

       किल्ले सज्जनगड या ठिकाणाहून शिवज्योत आणणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 

सुरेंद्र गुदगे युथ क्लबने केले चांदणी चौकात भगवामय वातावरण

            चांदणी चौकत शिवमूर्तीची स्थापना करून किल्ले पन्हाळा याठिकाणाहुन सुरेंद्रदादा गुदगे युथ क्लब व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी यांचेकडून किल्ले पन्हाळा येथून शिवज्योत आणण्यात आली. व भवानीदेवी मंदिरा पासून जि प सदस्य सुरेंद्र गुदगे,युवा नेते रित्त्विक गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदणी चौकात मोठ्या उत्साहात शिवज्योत आणण्यात आली. याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रेयस भोंगाळे,जय यादव यांचेसह काही बालचमूने छ.शिवाजी महाराज यांच्या विचारांना आपल्या भाषणातून अभिवादन केले. 

            यावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालक दादासो कचरे, अरुण जाधव, हेमंत जाधव,रणजित माने,स्वप्नील घाडगे,अविनाश दगडे,चेतन लांब,अभिजित कचरे,प्रवीण देशमुखे,सोमनाथ देशमुख,प्रवीण वाघ,राजन सोमदे,महेश जाधव,अक्षय दगडे यांचेसह युथ क्लबचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            सदर वेळी जि.प.सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी युवक वर्गाला व उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हंटले की, छ.शिवाजी महाराज संपूर्ण राष्ट्राला आदर्शवत व्यक्तिमत्व होते. त्यांच्या या विचारांचा वारसा युवकवर्गाने जोपासावा. त्याचबरोबर या भागातील प्रत्येक युवकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून त्याला पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

    शिवसेने कडूनही शिवरायांना अभिवादन

         मायणी येथील इंदिरानगर याठिकाणी शिवजयंती निम्मित छ.शिवरायांना अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे मायणी गट विभाग प्रमुख विशाल चव्हाण,पांडुरंग झगडे,फिरोज मुलाणी,प्रवीण साळुंखे,तानाजी लिपारे आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो -१)मायणी मीडिकल कॉलेजयाठिकाणी अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करताना डॉ.दिलीपराव येळगावकर,डॉ.एम आर देशमुख,प्रशांत जाधव इतर मान्यवर.

२)सुरेंद्रदादा गुदगे युथ क्लब यांच्यावतीने आयोजित शिवजयंती साजरी करताना जि. प.सदस्य सुरेंद्रदादा गुदगे,रित्त्विक गुदगे,दादासो कचरे व अन्य.

3)रक्तदान शिबिर ऑनलाइन सुविधा देण्याच्या कार्यक्रमात लाभ घेण्यासाठी झालेली गर्दी.

४)शिवसेने कडून इंदिरानगर याठिकाणी आयोजित शिवजयंती कार्यक्रमात अभिवादन करताना पांडुरंग झगडे,विशाल चव्हाण,फिरोज मुलाणी, तानाजी लिपारे व इतर.

(फोटो सर्व- दत्ता कोळी)

Views: 374
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
हेरिटेज सायन किल्ल्याजवळ बेकायदा खोदकाम(आर.पी.आय डेमोक्रॅटिक आंदोलनाच्या पावित्र्यात)

हेरिटेज सायन किल्ल्याजवळ बेकायदा खोदकाम(आर.पी.आय डेमोक्रॅटिक आंदोलनाच्या पावित्र्यात)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)