विज्ञान प्रयोग व प्रकल्प प्रदर्शन
शहरातील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेचा उपक्रम
त-हाडी
शिरपूर शहरातील आर सी पटेल प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग व वैज्ञानिक प्रकल्पांचे सादरीकरण केले. यासाठी शाळेत विद्यार्थ्यांचे प्रयोग व प्रकल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
वैज्ञानिक प्रयोग व प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन आर सी पटेल संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांच्या हस्ते झाले.
यावेळी आर. सी.पटेल प्राथमिक शाळा वरवाडे शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र परदेशी, मुख्याध्यापक गोपाल पाटील, मुख्याध्यापक मनोज पाटील, व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय वरसाळे, मुख्याध्यापक सी.डी. पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले होते. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता तिसरीतील ८० तर इयत्ता चौथी मधून १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.शाळेत जवळपास २०० विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर केले.तर इयत्ता बालवाडी, पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक व त्यांच्या माहितीचे प्रकल्प सादर केले होते. यात जवळपास ३८० विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अग्निशमन यंत्र, पवनचक्की, ज्वालामुखी, पाण्याच्या दाबावर चालणारी लिफ्ट, पाण्यात बुडणारे व पाण्यावर तरंगणारे पदार्थ-प्रयोग,ज्वलनास ऑक्सिजन वायू मदत करतो- प्रयोग,सोलर पंप,विजेरिवर चालणारे कुलर,वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याची टाकी,हृदयाचे कार्य दाखवणारे यंत्र,तरंगणारा फुगा, पाण्यात विरघळणारे व पाण्यात न विरघळणारे पदार्थ-प्रयोग, घर्षण जन्य चुंबकत्व-प्रयोग, हवेलाही वजन असते-प्रयोग असे विविध प्रयोग सादर केले.
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सीईओ डॉ. उमेश शर्मा व मुख्याध्यापक यांना आपल्या प्रयोगांविषयी माहिती दिली. प्रयोगांचे सादरीकरण केले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही ह्या प्रयोगांविषयी सादर करत्या विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली.
विज्ञान व प्रकल्प प्रदर्शनाचे सूत्रसंचलन विवेकानंद ठाकरे यांनी केले.तर गजेंद्र जाधव,प्रशांत चौधरी, अरुण हातेडकर, महेंद्र माळी, गणेश चौधरी, के.डी.राजपूत, विनोद माळी, वसंत भामरे,योगेश बागुल आदींनी मेहनत घेतली.