: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महावितरण विरोधात हल्लाबोल…
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या मागणीसाठी वडूजमध्ये महावितरण वर मोर्चा…
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. आज या मागणीसाठी राज्यभर आंदोलन झाले. वडूजमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरण समोर आंदोलन केले.
शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, वीज बिलाची अन्यायी वसुली थांबवा, वाढीव बिलाची दुरुस्ती करा इत्यादी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयासमोर गेल्या 8 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
शेतकऱ्यांना रात्री 8 ते पहाटे 4 या वेळात वीज देऊ नका. त्यांना ही रात्रीचा वेळ सोडून कधीही वीज द्या. कारण या वेळात शेतकऱ्यांवर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच उष्णतेमुळे साप बाहेर येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री सर्पदंश होण्याची भीती आहे. सर्पदंशाने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या असल्याचे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
4 मार्चपर्यंत जर दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला नाहीतर आंदोलन अधिक धारदार करु असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता.मात्र सरकारने काहीच निर्णय घेतला नसल्याने सरकारचा निषेध म्हणून स्वाभिमानीने आज संघटनेने आज ठिकठिकाणी आंदोलने केली. कोरोनाच्या आपत्तीमुळे आणि अतिवृष्टीमूळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुरता उध्वस्त झाला आहे. या संकटमधून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना महावितरणकडून शेतीपंपाची वसुली कुठलीही पूर्वसूचना न देता सुरू आहे. तसेच हटवादीपना करून कनेक्शन कट करून शेतकऱ्यांना मरणाच्या खाईत लोटायच काम चालले आहे.
दुसरीकडे विजबिलाबाबत सन्मानजनक तोडगा काढण्याऐवजी रात्री अपरात्री वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे.रात्रीच्या वेळी वीज मिळत असल्यानं शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं. याबाबत लवकर तोडगा काढला नाहीतर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी दिला आहे. आंदोलनाला स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते
अनिल पवार , संदीप मांडवे, सूर्यकांत भुजबळ, जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड, माण तालुका अध्यक्ष राजू मुळीक, तानाजी देशमुख, दत्तूकाका घार्गे देशमुख, अँड प्रमोद देवकर, डॉक्टर संतोष गोडसे, सचिन पवार,विजय शिंदे, बाबा फडतरे,नितीन देशमुख, बाबासो घार्गे, हर्षद घार्गे,महादेव जाधव, विनोद घार्गे, डॉ.नितीन जगदाळे, विजय माने आणि गोपुज, भुरकवडी, वाकेश्वर, पेडगाव, विखलेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.







