मायणी विभागाच्या कामकाजावर ओढले उपवनसंरक्षकानी ताशेरे
युवकवर्गाने केलेल्या कामाचे कौतुक करीत त्यांच्या सोबत वनराईची केली पाहणी
मायणी:- विशेष प्रतिनिधी
माणगंगा न्यूज पोर्टल च्या माध्यमातून”मायणी वनविभाग गंधारीच्या भूमिकेत” या मथळ्याखाली स्थानिक वनविभागाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आलेले होते. शासन व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी केलेल्या “निसर्गसवर्धनात सहभागी व्हा या आवाहनाचा विसर पडलेल्या स्थानिक वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांच्यावर पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संस्था व युवकवर्ग यांना वनसंवर्धन कामास सहकार्य न करणें व त्यांच्यकडून करण्यात आलेल्या इतर सूचनांकडे केलेल्या दूर्लक्षामुळे उपवनसंरक्षकानीं ताशेरे ओढले.

मायणी पक्षी आश्रयस्थानातील अनेक विषयांची दुरवस्था व साध्या परिस्थिती आणि संस्था व युवकवर्गाकडून करण्यात आलेल्या जुन्या मुख्य बगीचा , चांद नदी परिसराचे श्रमदान व संवर्धन कामाकडे स्थानिक वनविभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले होते. याबाबत माणगंगा न्यूज पोर्टलकडून यासर्व प्रकारावर खुलासा करण्यासंदर्भात बातमीपत्र प्रसिद्ध झाले होते. याबाबत उपवनसंरक्षक महादेव मोहिते काय भूमिका घेणार, या बाबत विचारणा झाली होती.
मायणी-येरळवाडी पक्षी समुह राखीव क्षेत्रासंबंधी शुक्रवारी मायणी येथे आराखडा समिती संबंधित गावांच्या सरपंच व इतर ग्रामस्थांची बैठक पार पडली. यानिमित्ताने आलेले उपवनसंरक्षक याना वरील विषयाबाबत पत्रकार व सामाजिक संस्था यांनी छेडले असता. यासंबंधी स्थानिक अधिकाऱ्यांना वृत्तपत्रात आलेल्या आपल्या कारभराविषयीच्या प्रश्नाना पत्रकार व काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना उत्तर देता न आल्यामुळे उपवनसंरक्षक मोहिते यांनी स्थानिक वनाधिकाऱ्यांच्यावर शासन सर्वत्र निसर्ग वाचवा यासंबंधी उपक्रम राबवीत आहे.यास स्वयंस्फूर्तीने सहभागी होणाऱ्या सामाजिक संस्था,युवक ग्रुप याना आपल्या विभागाकडून प्रोहोत्सहन देने आवश्यक असताना आपल्याकडून याकडे अक्षम्य दुर्लक्ष होणे हे योग्य नाही. स्थानिकांच्या सहकार्याशिवाय आपण कोणताही निसर्ग संवर्धनाचा उपक्रम पुढे नेऊ शकत नाही, यासाठी अशा वनसंवर्धन करण्याचे काम तडीस नेणाऱ्या लोकांची वनविभागास गरज आहे. असे म्हणत ताशेरे ओढले.

निस्वार्थ काम करणाऱ्या युवक ग्रामस्थांचे कौतुक व त्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी युवकांसोबत वनराईत मारला फेरफटका
मायणी वनविभागात पर्यटकांसाठी असणारा बगीचा व इतर परिसर अस्ताव्यस्त झाला होता यासाठी गावातील संस्थांनी ,युवक समूहाने निसर्गप्रेमी दत्ता कोळी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत याठिकाणी काम करून हा भाग अनेक दिवस श्रमदान करून स्वच्छ व सुंदर बनवला परंतु संबंधित विभागाने याकडे अनेक दिवसांपासून पून्हा दुर्लक्ष केल्याने हा भाग दुरावस्थेत गेला. उपवनसंरक्षक मोहिते यांनी या संस्थांची व युवकांची तळमळ बघून स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत युवकांनी श्रमदान करून सुंदर केलेली बाग,त्याठिकानांची पाणी व्यवस्था,जुनी रोपवाटिका परिसर,पक्षांची घरटी,रंगरंगोटी,कुंपण दुरुस्ती” जॅकवेल याची प्रत्येक्ष ठिकाणांवर जातं काट्याकुट्यातून वाट काढत पाहणी केली.

उपवनसंरक्षकांच्या या कृतीचे काम कर्नारून युवक भारावून जात केलेल्या कामाचे समाधान झाल्याची भावना व्यक्त केली. याचबरोबर वनविभागाच्या जिल्हा प्रमुखानीं युवकांकडून आलेल्या इतर समस्या व प्रश्नसंदर्भात तातडीने उपाययोजना करावीत आशा सूचना विभागाला दिल्या. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक रेश्मा होरकाटे,मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे,वनक्षेत्रपाल शीतल फुंडे,महेश तांबवेकर,पक्षीमित्र अंकुश चव्हाण,निसर्गमित्र दत्ता कोळी,रामभाऊ सोमदे,तानाजी चव्हाण ,मिलिंद देशमुखे,विशाल चव्हाण यांचेसह वनविभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी होते.
उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी केलेल्या सूचना
१)पर्यटक नोंदी व सुरक्षिततेच्या विषयी संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत कार्यवाही करावी.
२)स्थानिक समिती व उत्तर संस्था यांची महिना बैठक होणे आवश्यक.
३)संवर्धन कामात मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पोहोत्सन व मदत.
४)कुंपण तोडून विनापरवानगी प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा.

वृत्तपत्रातून आलेल्या बाबी विशेष विचाराधीन आहेत.याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत यापुढे अशा बाबी होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.मायणी वनक्षेत्र संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.याकडे निसर्गपाहणीस येणाऱ्यांची संख्या मोठी असून याठिकाणी संवर्धन कामात सहभागी होणाऱ्या संस्था व युवक वर्गाच कौतुक आहे.निसर्ग संवर्धन कार्यात पक्षी ,प्राणी,वन संपदा वाचवणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक असून लवकरच मायणी व लगतच संपूर्ण परिसर नैसर्गिक पर्यटन क्षेत्र म्हणून पुन्हा नावारूपास येईल. – उपवनसंरक्षक महादेव मोहिते,वनविभाग सातारा.
खटाव तालुक्यातील ऐतिहासिक व नैसर्गिक ठेवा म्हणून मायणी ब्रिटिशकालीन तलाव व पक्षी आश्रयस्थान प्रसिद्ध आहे.यास आज संरक्षित क्षेत्र म्हणून विशेष ओळख मिळावी असून याठिकाणी दुरावस्थेत झालेला परिसरास पुन्हा गतवैभव मिळावे यासाठी आम्ही युवक ग्रुप व इतर सामाजिक संस्थांना एकत्र करून काम केले होते. या झालेल्या संवर्धन कामाकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आम्हाला नाईलाजाने याचे वास्तव उपवनसंरक्षक मोहिते यांचेकडे मांडावे लागले.मोहिते यांनी आम्ही केल्या कामाचे कौतुक करीत प्रत्येक्ष आमच्या सोबत या ठिकानावरील कामांची पाहणी केली.यामुळे आजवर केलेल्या श्रमदांन इतर संवर्धन कामाचे समाधान मिळून यापुढील काळात आणखी काम करण्याचे प्रोहोत्सहन मिळाले. – दत्ता कोळी,निसर्ग संवर्धनात अग्रेसर होणारे ,निसर्ग मित्र,मायणी.
निसर्ग संवर्धनाच्या कामात सहभागी होणाऱ्या संस्था व युवकग्रुप यांच्याशी चर्चा करताना उपवनसंरक्षक महादेव मोहिते व इतर.
युवकांनी केलेल्या कामाचे फक्त कौतुकच न करता प्रत्येक्ष त्यांच्यासोबत त्याठिकाणी काट्याकुट्यातून जात पाहणी करताना उपवनसंरक्षक मोहिते,सहाययक वनसंरक्षक रेश्मा होरकाटे,वन्यजीव मानद सुनील भोईटे, शीतल फुंडे,दत्ता कोळी यांचेसह इतर मान्यवर….फोटो -विशाल चव्हाण.







