आटपाडी तहसीलदार यांच्या वाहनावर भरधाव वेगाने डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी आटपाडी तहसील कार्यालयाचे गस्ती पथक पहाटे पावणे चार वाजता आटपाडीच्या बाबानगर चौकामध्ये थांबले होते या गस्ती पथकामध्ये तहसीलदार बाई माने तलाठी समीर मुल्ला कोतवाल संजय माने कोतवाल गोरख जावीर यांचं पथक होतं मुळेवाडी ते आटपाडी या दिशेने एक डंपर भरधाव वेगाने येत होता त्या डंपर ला तहसील कार्यालयाच्या पथकाची चाहूल लागताच त्याने पथकाला चकवा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र या पथकाने या डंपरचा पाटला केला मात्र हा डंपर या पथकाला मिळून आला नाही याच दरम्यान मुढेवाडी ते आटपाडी येणाऱ्या रस्त्यावर सूतगिरणी जवळ समोरून तोच डंपर येत होता या डंपर ला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो न थांबता सरळ तहसीलदार यांच्या गाडीवरती येऊन आदळला तहसीलदार यांच्या गाडीच्या चालकाने प्रसंगावधान दाखवत बचावाचा प्रयत्न केला मात्र दोन्ही वाहनांमध्ये टक्कर होऊन दोन्ही वाहने एकमेकांमध्ये अक्षरशा अडकली ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला सदर घटनेनंतर डंपर चालकाला पथकाने पकडले असून डंपर ताब्यात घेतला आहे सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे