जि.प.शाळा शेडगेवाडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
मायणी:- दत्ता कोळी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगेवाडी (चितळी)येथे विविध शैक्षनिक साहित्य व खाऊ वाटप उत्साहात करण्यात आले. चालू वर्षातील शैक्षणिक शिक्षण घेणाऱ्या नविन शाळा व्यवस्थापन समितीचा सत्कार, शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मिळालेल्या साहित्याचा वापर व प्रत्यक्ष गोड पोष्टिक पोषण आहार मुलांना देण्यात आला, सर्व पात्र मुलांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी खाडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण सर्वजण मिळून कसे काम करू शकतो याची माहिती दिली व गावातील पार, मंदिरे, घराचा व्हरांडा, या ठिकाणी आरेखन तयार करून मुलांचा अभ्यास करून घेता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी मंडले , लालासो जानकर, बालाजी पवार, श्रीरंग फाळके, चंद्रकांत कदम यांनी शासकीय गणवेशास पात्र नसणाऱ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश देण्याचे जाहीर केले.
यावेळी कार्यक्रमासाठी सुवर्णा कदम, अपर्णा पवार व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , पालक व ग्रामस्थ प्रविण मोहिते,. बाळासो मोहिते, अजित मोहिते, महेश कदम,शरद कदम , ज्ञानदेव कदम , सागर शेडगे , राहुल जाधव , दिपक सावंत , सुभाष मंडले उपस्थित होते . उपस्थितांचे सत्यवान खरमाटे सर यांनी मानले.







