बसवेश्वर भुर्जे यांचा निंबवडे मध्ये सत्कार !
आटपाडी ;
आटपाडी पंचायत समिती अनेक सभापतींच्या गाडीच सारथ्य केलेले वाहन चालक बसवेश्वर दत्तात्रय भूर्जे हे 30 तारखेला सेवानिवृत्त झाले त्यावेळी त्यांचा निंबवडे ग्रामपंचायत येथे सत्कार करताना विद्यमान सभापती जयवंत भाऊ सरगर , निंबवडे सरपंच जयंत देठे , उपसरपंच धोंडीराम मेटकरी, माजी सरपंच धुळादादा देवडकर, सदस्य कुंडलिक पिंजारी,नानासाहेब झुरे सर, माजी उपसरपंच नाथासो बुधावले, सुनील डोंबाळे शेट, योगेश मुढे धनाजी पाटील, राम अनुसे , मारुती पिंजारी, निंबवडे कोतवाल पोपट वाघमारे, यशवंत मुढे , सोपान पिंजारी, व इतर मान्यवर
आपल्या 36 वर्षाच्या सेवेत भुर्जे अण्णा यांनी जत येथे पाच वर्षे व उर्वरित 31वर्षे सेवा त्यांनी आटपाडी तालुक्यात केली , त्यात त्यांनी खरसुंडी पी एस सी ला 9वर्षे सेवा केली आटपाडी पी एस सी ला 5वर्षे आणि राहिलेली 17वर्ष सेवा त्यांनी आटपाडी पंचायत समिती येथे केली त्यांनी केलेल्या सेवेबद्दल निंबवडे ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केला