• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

पडद्यामागील कलावंताना मदत करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

माणगंगा by माणगंगा
July 2, 2021
in पुणे
0
पडद्यामागील कलावंताना मदत करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

पडद्यामागील कलावंताना मदत करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ यांना अपघाती विमा प्रमाणपत्राचे वितरण

पडद्यामागील कलावंताना मदत करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे,

दि.2:- चित्रपट व नाटकाच्या क्षेत्रात पडद्यामागे राहून काम करणारा तसेच सामान्य रंगकर्मी यांचे काम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोरोनाच्या काळात नाटक, चित्रपटांचे प्रदर्शन बंद असल्याने या वर्गाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने सर्वच गरीब, गरजू समाजघटकांना मोफत अन्नधान्य, मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करत असताना, सामाजिक संस्थांकडूनही अशा गरजूंसाठी मदतीचा हात पुढे येणे आवश्यक आहे. ‘आनंदी वास्तू’ व ‘संवाद-पुणे’ संस्थेने पुढे केलेला हा मदतीचा हात अत्यंत महत्वाचा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. राज्य शासनही पडद्यामागील कलावंताना मदत करण्याबाबत सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे पत्रकार भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ यांना अपघाती विमा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी आनंदी वास्तू संस्थेचे अध्यक्ष आनंद पिंपळकर, संवादचे सुनील महाजन, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका निमिता मोघे, डॉ.अश्विनी शेंडे उपस्थित होते.

नाटक-चित्रपटांच्या झगमगाटी दुनियेत, पडद्यामागे राहून, कलाक्षेत्राची सेवा करणाऱ्या रंगकर्मींना, कोरोना संकटकाळात, विमा संरक्षणाचा आधार दिल्याबद्दल ‘आनंदी वास्तू’ व ‘संवाद-पुणे’ संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याकडे बघितले जाते. साहित्य, नाटक, चित्रपट, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात पुण्याने नेहमीच आदर्श निर्माण केला आहे. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात काम करत असताना ‘आनंदी वास्तू’ व ‘संवाद-पुणे’ संस्थेनं, गरजू रंगकर्मींसाठी मदतीचा हात पुढे करुन, एका आगळ्यावेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडवले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मराठी माणूस नाटकवेडा आहे. नाट्यकलेला पहिल्यापासून राजाश्रय आणि लोकाश्रय मिळत आला आहे. नाटक व चित्रपटांनाही शासनाची कायम मदतीचीच भूमिका राहीली आहे. चित्रपट व नाटकाच्या क्षेत्रात पडद्यामागे राहून काम करणारा, सामान्य रंगकर्मी यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या काळात नाटक, चित्रपटांचे प्रदर्शन बंद असल्याने या वर्गाला अडचणींचा सामना करावा लागतो. कलाक्षेत्राला मदत करण्याचीच राज्य शासनाची भूमिका राहिली आहे. यापुढेही राहील, असा विश्वास देत कोरोनामुळे चित्रपटांच्या, नाटकांच्या प्रदर्शनांवर काही निर्बंध आहेत. मध्यंतरी आपण निर्बंध कमी केले त्यानंतर अचानक रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजनची कमी जाणवायला लागली. या परिस्थितीत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाईलाजाने काही निर्बंध लावले आहेत. लोकांचा जीव वाचला पाहिजे. लोकांचा जीव वाचवण्याला आपलं पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे जसा धोका कमी होईल, तसे निर्बंध हळू हळू कमी केले जातील, असे त्यांनी सांगितले.

संवादचे सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका निमिता मोघे यांनी आभार मानले. यावेळी पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ यांना अपघाती विमा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच निवडक कलावंताचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, पडदयामागील कलावंत-तंत्रज्ञ उपस्थित होते.

Views: 195
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस !!

राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद जीवणे यांचे उपोषण स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)