राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन्मान सोहळा २४ एप्रिलला सातारा येथे संपन्न होणार
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची माहिती
सातारा/मायणी :- प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन्मान सोहळा यंदा महाराष्ट्रातील सातारा येथे रविवार दि .२४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ठीक ११ पुणे-बेंगलोर हायवेलगतच्या हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह याठिकाणी महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील,गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई,माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण,खासदार श्रीनिवास पाटील,माजी आमदार दिलीपराव येळगावकर,हरणाई सुतगिरिणीचे संस्थापक चेअरमन रणजितसिंह देशमुख,पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,मानसिंगराव जगदाळे आदी प्रमुख मान्यवरांच्या तसेच देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती ,आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संतोष बजाज यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
न्याय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संतोष बजाज सदर सन्मान सोहळ्याची माहिती देताना म्हणाले की,देशातील प्रत्येक प्रदेश आपापल्या परीने देशसेवेसाठी आपल्या स्तरावर निस्वार्थ भावनेने समाजकार्य, जनसेवेचे कार्य व मानवता सेवा कार्याबरोबरच आपले सत्कर्म करून योगदान देत आहेत.ज्यांच्या कार्यातून हजारो लोकांप्रमाणेच, IHRSJC नेही अशा लोकांकडून प्रेरणा घेतली आहे. IHRSJC चा मुख्य उद्देश त्यांना मोठ्या मंचावर आमंत्रित करणे आणि अशा कार्यकुशल व्यक्तीमत्वांचा पुरस्कार, पदके, आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे आणि शाल देऊन सन्मानित करून त्यांचे कार्याचे कौतुक करणे हा आहे.
जे लोक आपल्या निस्वार्थ भावनेने असे पुण्य आणि मानवतावादी कार्य करून देशाचे नाव रोशन करतात, जेव्हा अशा लोकांना मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचावर सन्मान मिळतो तेव्हा हजारो, शेकडो लोक या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेरित होतात.वाईटाचा मार्ग सोडून चांगल्याच्या मार्गावर चालत आपले आयुष्य चांगले घडवतात .या कार्यक्रमाच्या निम्मिताने श्री .बजाज यांनी “एकत्र या, सर्वांचा आदर करा आणि एकमेकांचे सहकार्य करा,” चा नारा दिला आहे.
सातारा याठिकाणी होणाऱ्या या भव्य राष्ट्रीय सत्कार समारंभात १०० हून अधिक पुरस्कार प विविध क्षेत्रात आपल्या मानवतावादी आणि सामाजिक कार्याने देशाचे नाव रोशन करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मेडिकल व वैद्यकीय क्षेत्र,उत्कृष्ट सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था ,उत्कृष्ठ नारीशक्ती स्त्री सन्मान ,उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट अकॅडमी शिक्षण ,उत्कृष्ठ रक्तदाता,अशा विभागातील अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सर्व सन्मानितांना युनिक अवॉर्ड ट्रॉफी, IHRSJC प्राईड गोल्ड मेडल आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष विश्वदीप आपगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमरदिप आपगे,जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.संतोष डांगे , सातारा जिल्ह्याचे कार्यक्रम आयोजक मिलिंद देशमुखे यांनी यावेळी दिली.
फोटो – राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संतोष बजाज







