कवठे महांकाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अग्रणी नदी पात्रा लगत असणाऱ्या विहिरीवरती R O फिल्टर प्लॅन्ट बसवण्यात आला
शहरांतील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून नागरिकांना पिण्या योग्य फिल्टर पाणी मिळावे यासाठी कवठे महांकाळ नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते विशाल ऊर्फ लालासाहेब वाघमारे यांच्या मागणीेनुसार व नगरपंचायत कवठे महांकाळ चे सर्व नगरसेवक यांच्या वतीने त्या मागणीसाठी जो पाठिंबा देऊन पाठपुरावा केला गेला त्यामुळे आजचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात आला व आजपासून शहरांतील नागरिकाना जे पाणी विकत घ्यावं लागत होतं ते आता दरातल्या नळाला येणार आहे…. या RO water purifier फिल्टर प्लॅन्ट चे उद्घाटन कवठे महांकाळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिलीप काका पाटिल, प्रकाश थोरात साहेब, माळे वाडी येथील ज्येष्ठ नागरिक मारुती माळी, आंबेडकर नगर येथील ज्येष्ठ नागरिक पंडित चंदनशिवे,महादेव वाघमारे गुरुजी, आनंद राव भंडारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी कवठे महांकाळ शहराच्या एकमेव माजी महिला सरपंच सौ बबुताई वाघमारे, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी, युवा उद्योजक नितीन माने, दिलीप वाघमारे व प्रभाग क्रमांक 15,16 आणि 17 मधील जेष्ठ नागरिक बंधू भगिणी मोठया संख्येने ऊपस्थित होते.