महागाई विरोधात केंद्रसरकरच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जतमध्ये आंदोलन
माणगंगा न्यूज जत:-
आजकल महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य गांजलाय.त्यात आता घरातल्या गृहिणीचंही बजेट नरेंद्र मोदींच्या भाजपाशासित केंद्र सरकारने कोलमडवलं आहे. ज्यावर सर्वसामान्य माणसाच्या घरातला स्वयंपाक होतो, तो एलपीजी गॅस सिलिंडरचा दर अचानक २५ रुपयांनी वाढवलायं.”जगावं की मरावं” या प्रश्नावर आता मन की बातचं उत्तर जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने देशातील इंधन दरवाढ व महागाई विरोधात,केंद्र सरकारच्या निषेधार्थ जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
घरगुती गॅस सिंलिंडरची किंमत वाढून ८४७ रुपये झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबाला साधारणतः २० दिवसच एक सिलिंडर पुरतं. त्यामुळे ज्याचं मासिक उत्पन्न कसंबसं सहा ते १० हजार रुपयांच्या आसपास आहे, त्या देशातल्या सर्वसामान्यांच्या घराचा इंधनाचा खर्च मोदींनी दीड हजार रुपयांचा करून ठेवला आहे.
आज इंधन दरवाढीवर ताशेरे ओढूनही मोदी सरकार ढिम्म हलायलाही तयार नाही. पेट्रोल शंभरीपार गेलं, तेव्हा लोकांनी त्यावर विनोद केले. सोशल मीडियावर मिम झाले. पण केंद्र सरकारने काहीच उपाययोजना केली नाही. केवळ निवडणुकीपुरतंच गिमिक करायचं त्या त्या राज्यात निवडणुका लागल्या की इंधन दरवाढ नियंत्रित करायची आणि निवडणुका संपल्या की आपल्या आश्वासनांचा विसर पडत सर्वसामान्य माणसांना वाऱ्यावर सोडायचं काम केंद्रातील भाजप सरकारने केले आहे.सध्य परिस्थितीत पेट्रोलचे दर १०६ रुपयांच्या पुढे राज्यात अनेक ठिकाणी गेले. डिझेलही शंभरीचा पल्ला गाठत आहे. पेट्रोलच्या सेंच्युरीच्या विनोदाचे केंद्र सरकारला फारसे वावडे उरलेले नाही. त्यांची कातडी निबार झाली आहे. मात्र सर्वसामान्य माणसाच्या तोंडचं अन्नही आता मोदीजी हिरावून घेऊ पाहात आहेत, हेच का त्यांचे अच्छे दिन?
आज केंद्रात सत्ता असलेले भाजपाचे लोक एकेकाळी इंधन दरवाढीवरून आकाश पाताळ एक करायचे. सरकारच्या नावाने खडे फोडायचे.
आता त्या कालखंडाच्या दुप्पट-तिप्पट इंधनाचे दर झालेत. परंतु केंद्र सरकार दरांचं नियमन करायला तयार नाही. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांचं कंबरडं मोडलं तरी चालेल अशी या मोदी सरकारची भूमिका आहे.इंधन दरवाढीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो. सध्या गेल्या दीड वर्षांतल्या कोविड प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत, ज्यांचे रोजगार आहेत त्याच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे आपला खर्च कसा भागवायचा ही एकच समस्या लोकांसमोर आहे. अशा कालखंडात केंद्र सरकार मात्र मूग गिळून बसलं आहे. त्यांना कुठलीच संवेदनशीलता राहिलेली नाही.
या सर्व गोष्टींमुळेच केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या दरवाढीचा निषेध म्हणून याविरोधात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने शनिवार दि. 03 जुलै रोजी तहसिल कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तालुक्याचे जेष्ठ नेते सुरेशराव शिंदे, तालुका अध्यक्ष रमेश पाटील, कार्यध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण, सिद्धू आण्णा शिरशाड, जिल्हाउपाध्यक्ष बसवराज धोडमनी, तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र वाघमोडे, माजी सभापती शिवाजी शिंदे, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, नगरसेवक स्वप्निल शिंदे, वक्ता विभाग जिल्हा उपाध्यक्ष जयंत भोसले, युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी, आप्पासाहेब पुजारी वकील, विद्यार्थी तालुका अध्यक्ष पवन कोळी, पिरसाहेब शेख, नवाज शेख, श्रीधर हिरगोंड, लक्ष्मण कदरे, विकास लेंगरे, हेमंत खाडे, राहुलसिंह डफळे सरकार, राजेसाहेब डफळे सरकार, भाऊसाहेब शिंदे, सतिश शिंदे, संभाजी शिंदे, संजय शिंदे, सचिन बोराडे (उपसरपंच शेगाव), दादासाहेब पाटील, संभाजी पाटील, यशवंत कोळी, रमेश माळी (वळसंग सरपंच), अजयकुमार शिंदे, आशपाक बारुदवाले, आण्णासाहेब कोडग (आवंढी- सरपंच), शफीक इनामदार, इम्रान गवंडी, पापा हुजरे, डॉ.लालासाब हैद्राबादे, शौकत शेख, राजू मुल्ला, रुपेश कांबळे,संजय साळुंखे,नंदकुमार निळे, प्रकाशबापू पाटील, राजकुमार शिंदे मेजर, सदाशिव कांबळे, युवराज पाटोळे व इतर असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.