कोसारीत ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने रक्तदान शिबीर व कोरोना योद्धांचा सन्मान
माणगंगा न्यूज जत:-
कोसारी (ता.जत) येथे ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. खेडेगावातसुध्दा रक्तदानासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. मंगल भोसले आणि नीता सोहनी या दोन महिलांनी स्वतः प्रेरित होऊन रक्तदान केले.
रक्तदान शिबीराच्यावेळी कोरोना काळात चांगले कार्य केलेल्या कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये डॉ.शिवाजीराव खिलारे( शेगाव बागलवाडी), महादेव संकपाळ( आरोग्यसेवक कुंभारी), नीता सोहनी ( आरोग्य सेविका कोसारी), मुक्त गित्ते (आरोग्य सेविका), आरती तोरवे ( आशा सेविका), कविता पाटील(आशा सेविका) यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या महिन्यामध्ये कोसारी गावातील दोन सैनिक सेवानिवृत्त झाले. यशवंतजी सकट व गुंडाजी कुंभार या सैनिकांचा 30 वर्ष भारतीय सैन्यामध्ये सेवा करुन निवृत्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सहपरिवार त्यांचा सत्कार करण्यात आला.
विश्वजित सूर्यवंशी(माहिती अधिकार संघटक सांगली), अक्षय रक्त केंद्राचे अध्यक्ष संजयकुमार शिंदे ,उदय पाटील, डॉ.शिवाजीराव खिलारे,सुरेश सावंत (मुख्याध्यापक), डॉ.धनाजी यमगर आणि संस्थेचे अध्यक्ष विवेक टेंगले उपस्थित होते.
रक्तदान शिबीराचे मुख्य मार्गदर्शक विश्वजित सूर्यवंशी हे होते.विजय साळे,लक्ष्मण भोसले, विकास गावडे, पंकज जाधव,सुभाष सोनुरे, पत्रकार सुभाष हाक्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले.गावातील माजी सैनिक टीम सुभेदार प्रकाश साळे, नानाजी संकपाळ, वसंत काळे,पांडुरंग बुरुटे,वसंत सकट, हरिदास सांगोलकर यांनी शिबीर ठिकाणी भेट दिली. संस्थेचे सर्व पदाधिकारी बापू भोसले,दिगंबर गोरे, विमल साळे,मनीषा काळे, रुपाली खरात, विश्वास खटके, ओंकार काळे, विशाल महारनुर, संतोष नरुटे उपस्थित होते.सचिव सागर गुजले यांनी आभार मानले.