गोंदवले खुर्द मधील अपघातात पणवन च्या दोन संख्या चुलत भावांचा मृत्यू
दहिवडी प्रतिनिधी :
गोंदवले खुर्द मधील अपघातात पणवन च्या दोन संख्या चुलत भावांचा मृत्यू
दहिवडी प्रतिनिधी


गोंदवले खुर्द मध्ये मेजर हॉटेल समोर आज सकाळी दोन दुचाकी आणि स्विफ्ट कार मध्ये भीषण अपघात झाला या अपघातात पानवन ता माण येथील दोन सख्खे चुलत भाऊ ठार झाले तर तीन जण जखमी झाले आहेत.हा अपघात एवढा भीषण होता की अपघाता नंतर पल्सर गाडीने पेट घेतला तर स्विफ्ट गाडी तीस फूट लांब एका रानात जाऊन पलटी झाली सदर अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर तपास करत आहेत.
पानवन गावचे ग्रामदैवत श्री मरीआई देवीची यात्रा शुक्रवार आणि शनिवार असून या यात्रेसाठी गावातील लोक मोठ्या संख्येने येत असतात.याच यात्रेसाठी जाताना अपघात झाला
अजित शंकर नरळे वय 18 आणि त्याचा चुलत भाऊ उमाजी आप्पा नरळे वय 22 रा पानवन ता माण हे आज सकाळी पुण्यातून पल्सर नंबर माहीत नाही तर दुसरी दुचाकी MH 11 CK 8043 तर एक स्विफ्ट कार क्रमांक MH 14 GH 4458 ही कार महेंद्र ज्ञानू वाघमारे दिघंची आटपाडी येथील असून त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा आशिष महेंद्र वाघमारे हे पुण्याला निघाले होते गोंदवले खुर्द येथे मुख्य रस्त्यावरून जाताना मेजर हॉटेल समोर या गाड्यांचा भीषण अपघात झाला या अपघातात स्विफ्ट कारने धकड दिल्याने पल्सर गाडी एका रानात जाऊन पडली व त्या गाडीने पेट घेतला त्यात ती पल्सर जळून खाक झाली तर त्या गाडी वरील उमाजी नरळे हा नेपाळ येथे सोन्या चांदीच्या दुकानात काम करतो तो जागीच ठार झाला तर त्याचा चुलत भाऊ अजित नरळे हा कराडला उपचारासाठी नेहताना ठार झाला. तर नामदेव नागु वीरकर वय 45 रा जांभुळणी ता माण हे जखमी झाले त्यांना उपचारासाठी सातारा येथे दाखल केले आहे अपघाता नंतर रस्त्यावर फार मोठी गर्दी झाली होती ही माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस श्री केतन बर्गे,गजानन वाघमारे व श्री राऊत यांनी तात्काळ रोड वरील गर्दी हटवून रस्ता खुला केला.
व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष तासगावकर यांनी पाहणी केली
चौकट
अजित नरळे हा आई वडिलांना एकुलता एक असून उमाजी याला एक भाऊ आणि चार बहिणी आहेत दोघांच्या ही घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून आई वडील ऊसतोड मजूर म्हणून काम करतात ऊसतोडणी काम संपवून ते नुसकतेच घरी आले होते कुटुंबाला आधार देण्यासाठी अजित हा पुण्यात एका कंपनीत काम करतो तर उमाजीच्या घरची परिस्थिती ही अशीच असून त्याचे आई वडील पण ऊसतोडणी का करतात तर उमाजी हा गेल्या दीड वर्षा पासून नेपाळ मध्ये सोन्या चांदीच्या दुकानात काम करत होता दीड वर्षा नंतर तो यात्रे निमित्त मोठ्या आनंदाने गावी येणार होता मात्र उमजीची यात्रेला पोहोचण्याची इच्छा अपुरीच राहिली या दोघांच्या निधनाने पानवन गावात सन्नाटा पसरला होता सगळे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते







