खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ होण्यासाठी आ.गोपीचंद पडळकर यांचे राज्यपालांना निवेदन.
खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ होण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचे राज्यपालांना निवेदन या निवेदनामध्ये म्हटले आहे की शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे उपकेंद्र खानापूर जि. सांगली येथे होण्याच्यादृष्टीने सन 2013 -14 पासून संबंधित प्रक्रिया सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे या विषयात सिनेट मॅनेजमेंट कौस्नीलची शिफारस होऊन 22 /5 /2014 रोजी या समितीच्या अध्यक्ष व सदस्य यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून खानापूर येथील गट क्रमांक 772/ 01 /42 56 हेक्टर आर. ही सरकारी जागा उपकेंद्र प्रयोजनासाठी द्यावी अशी शिफारस केली होती.
खानापूर साठी निश्चित झाले नंतर आता नव्याने हे उपकेंद्र बस्तवडे ता.तासगाव या ठिकाणी गेल्याची चर्चा सुरू आहे .खानापूर हे ठिकाण प्राकृतिक दृष्ट्या अतिशय सोयीचे असून सदर जागा ही राष्ट्रीय महामार्गावर आहे. या जागे शेजारील खानापूर असलेने कार्यक्षेत्रातील सर्वच गावांना या विद्यार्थ्यांना सोयीचे आहे.
तरी सदर जागा सोयींनी युक्त असलेले खानापूर या ठिकाणी मंजुरी देण्यात राज्य सरकारला सूचना करावी अशी विनंती आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यपालांना निवेदनाद्वारे केली आहे.