ध्येय , स्वप्नपूर्ती . दूरदृष्टी या शब्दांची ताकत दाखवणाऱ्या खूप गोष्टी आपण पहिल्या असतील . अशीच एक प्रेरणादायी सत्य कथा आहे , माण तालुक्यातील पिंगळी येथिल युवा दिग्दर्शक अमर शिंदे यांची आहे.

पिंगळी बु!! या छोट्याशा गावातील सामान्य कुटुंबात राहणारा आज आपल्या मेहनत व जिद्दीच्या जीवावर राष्ट्रीय कला गौरव पुरस्काराचा मानकरी ठरला आहे शिंदे यांनी शिक्षणानंतर ही आपली आवड जोपासली व माण तालुक्या सारख्या दुष्काळी भागात जास्त सुविधा नसताना ही , एक अनोखी भेट , पाकळी , फ्रेंडशिप , आस प्रेमाची , हृदयांत , गुंतन ... आशा अनेक लघुपटांची निर्मिती केली .
तसेच सफर माणदेशी ‘ सारखी वेबसिरीज ची निर्मिती करून माण देशाचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून त्यांना स्वप्नपूर्ती फाउंडेशन , कोल्हापूर , TBFF(कोलकाता) , ICFF (बंगलोर) या संस्थेचे पुरस्कार मिळाले व नुकताच बुलढाणा फिल्म सोसायटी तर्फे ‘ राष्ट्रीय कला गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

सुरुवातीच्या काळात फक्त आवड म्हणून याकडे ते पाहत होते , परंतु कालांतराने ही फक्त आवड न राहता शिंदे घराण्याची परंपरा पुढे घेऊन जाण्याचे ध्येय डोळ्यासमोर उभे राहिले.
तशी पिंगळीतील शिंदे घराण्याची पूर्वीपासूनच एक वेगळी ओळख आहे. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्वात जुनी म्हणजे जवळपास 100 वर्षां पूर्वी त्यांच्या आजोबांनी बांधलेली माडी . त्यांचं अमर शिंदे यांचे कुटुंब अजूनही याच घरात वास्तव्यास आहेत . यांचे आजोबा स्व. दाजी मारुती शिंदे हे एक शिक्षक होते. त्याच सोबत ते एक उत्तम सुतार काम करायचे .
त्याचबरोबर अमर शिंदे यांचे मोठे चुलते स्व.जनार्धन शिंदे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जिवलग मित्र . दहिवडी ता . माण येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाचे ते पहिले मुख्याध्यापक होते.
अशाप्रकारे त्यांच्या शिंदे घराण्याची एक वेगळीच ओळख या भागामध्ये आहे. परंतु अमर शिंदे यांचे वडील हे दारू च्या अति व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांची ही पिढी काही काळ भरकटत राहिली , परंतु अमर च्या आई श्रीमती . मंगल श्रीधर शिंदे यांनी संघर्ष व कष्टाने त्यांच्या चारही मुलांचं संगोपन केलं.
परंतु आईचं स्वप्न व घराण्याची ओळख व परंपरा कायम ठेवण्यासाठी अमर शिंदे प्रयत्नशील आहेत.







