जतमध्ये महिलांना खात, बियाणे, वाटप!
माणगंगा न्यूज जत:-
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर GIZ, BAYER व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोविड १९ रिस्पॉन्स प्रकल्पाच्या माध्यमातून, महिलांच्या हलाखीच्या काळात झालेले नुकसान व शेतीतून घटलेल्या आर्थिक उत्पादनास हातभार लावण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी GIZ या जर्मन सरकारच्या संस्थेने महाराष्ट्र मधील BAYER या कीटकनाशके, बियाणे निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून महिला आर्थिक विकास महामंडळाने विविध जिल्ह्यात स्थापित केलेल्या क्रांती लोकसंचलीत साधन केंद्राच्या बचत गटातील महिला शेतकऱ्यांना विविध प्रकारचे बियाणे,कीटकनाशके व खते सवलतीच्या दरात महिला शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचविण्याचा कार्यक्रम हाती घेतला.
या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून क्रांती लोकसंचलित साधन केंद्र जत, या लोकसंचलित साधन केंद्राच्या कार्यक्षेत्रातील महिला शेतकऱ्यांना प्रत्येकी १ एकर क्षेत्रासाठी लागणारे उच्च प्रतीची मका बियाणे ५० शेतकरी यांना तसेच आंबा १३२० रोपे व पेरू १०० रोपे महिला शेतकरी यांना अत्यंत अल्प व सवलतीच्या दरात वाटप करण्यात आले.
जत येथील अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकरभाऊ जाधव यांच्या हस्ते वाटप केले.प्रभाकर जाधव यांनी या माध्यमातून कोविड महामारीच्या काळात महिला शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून थोड्या प्रमाणात त्याचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास हातभार लागणार आहे. यासाठी बायर कंपनीच्या वतीने पीक लागवड तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, अळी व कीड व्यवस्थापन तसेच खतांचा सुयोग्य वापर याविषयी मार्गदर्शन आयोजित करून स्पर्धात्मक उत्पादन वाढीचे तंत्र महिला शेतकऱ्यांना शिकवण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी मेडीदार, व्यवस्थापक पिराजी तांबे, लेखापल प्रसाद पोतदार, सर्व सहयोगिनी व बचत गटातील महिला सदस्या उपस्थिती होत्या.