आटपाडी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी पगारवाडी साठी गावाला वेठीस धरू नये वरिष्ठ कडे न्याय मागावा किंवा कोर्टात जावे
वृषाली पाटील
सरपंच
आटपाडी ;
आटपाडी ग्रामपंचायत कर्मचारी यांना यापूर्वी दर वर्षाला ५०० रुपये पगारात वाढ होत होती. आपल्या कार्यकाळात फेब्रुवारी २०१९ च्या पगारात ५२५ रुपयांची वाढ केली, त्यानंतर आक्टोंबर २०१९,
जुलै २०२० व आत्ताच
जुन २०२० प्रत्येकी ५०० रुपये वाढ अशा एकुण ३ वर्षांमध्ये ४ वेळा पगारात वाढ केली, म्हणजेच एका कर्मचारी यांना २०२५ रुपये पगार वाढ करुन देखील कर्मचारी पगार वाढ केलीच नाही असे म्हणुन कर्मचारी यांनी सोमवार दि. ५ जुलै पासुन बेमुदत काम बंद आंदोलन पुकारुन गावचा पाणी पुरवठा सुध्दा बंद केला आहे.
दिवसाला कमीतकमी ५०० ते ७०० रुपये प्रत्येक दिवसाला मिळालेच पाहिजेत अशा अवाजवी मागणी वर कर्मचारी ठाम असल्याने कालची चर्चा निष्फळ ठरली. पगार वाढ चुकीचे असेल तर वरिष्ठांकडे दाद मागावी अगर कोर्टात दाद मागावी परंतु त्यासाठी संपूर्ण गावाचा पाणी पुरवठा बंद ठेऊन संपूर्ण गावास वेठीस धरू नये अशी विनंती सरपंच सौ.वृषाली पाटील यांनी केली आहे.
तरी पण लवकरच सकारात्मक मार्ग निघेल. नागरिकांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत. कृपया नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती