विठ्ठलनगर येथील लसीकरण केंद्रास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
लसीकरणास जागर फाउंडेशनचे सहकार्य लसीकरणासाठी महिलांची संख्या लक्षवेधी होती.
माणगंगा न्यूज जत:-जत शहरातील विठ्ठलनगर येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रास महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या लसीकरण केंद्रावर आज आखेर 253 जणांनी लस घेतली आहे. लसीकरण केंद्राचे उद्घाटन तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना तहसीलदार सचिन पाटील म्हणाले की, कोरोनावर सर्वांनी मिळून मात करूया, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा, लसीकरण करून घेणे आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी गरजेचे आहे.यावेळी बोलताना जागर फाउंडेशन संस्थापक तथा माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे म्हणाले की, कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी लस घ्यावे. लस ही सुरक्षित असून विठ्ठलनगर तसेच दत्त कॉलनी, शिर्के गल्ली, मदारे गल्ली,एकता नगर, शिंदे मळा ,अदाटेवस्ती पाटील मळा, गावडे वस्ती, माने वस्ती,येथील नागरिकांनी लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी. असे आव्हान जागर फाऊंडेशनचे संस्थापक परशुराम मोरे यांनी केले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, चंद्रशेखर गोब्बी, जागर फाऊंडेशनचे संस्थापक तथा माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे आदी जण उपस्थित होते.