फडणवीस यांच्या कडून पंकजाताई यांना नमोहरम करण्यासाठी वापरली कपटनिती: स्वाती मोराळे .
लोकनेत्या पंकजाताई मुंढे यांना नमोहरम करण्यासाठी आणखी काही कपट निती अवलंबू जाऊ शकतात. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री या वाक्याने घायाळ झालेले अहंकारी फडणवीस यांनी गेली सहा वर्षे ताईंचे प्रत्येक वेळी पंख छाटण्याचे काम केले आहे. तथाकथित चिक्की घोटाळ्याचे कुबांड रचुन जनतेच्या मनात प्रतिमा मलिन करण्याचे पहिले काम त्यांनी केले.
जलसंधारण विभागाचे उत्तम काम करत असताना त्यांचे नाव मोठे होत असताना ते होऊ नये म्हणून ते खातेच काढून घेतले. विधान सभेला विरोधकांना रसद पुरवून पाडण्याचे काम केले. शिवसंग्रामला बळ देऊन ताईंच्या विरोधात डोकं भडकवण्याचे काम त्यांनी केले. विधान परिषदेत पुनर्वसन न करता वंजारी समाजाचे दुसरे नेते यांना आणून त्यांना बळ दिले. ऊसतोड मजुरांचे नेत्रत्व सुरेश अण्णा धस यांच्या कडे देण्याचा प्रयत्न केला. ओबीसी नेत्या म्हणुन पुढे येऊ नये म्हणुन राम शिंदे यांच्याकडे देण्याचे काम केले.
केंद्रीय मंत्री मंडळात प्रीतम ताईंना मंत्री पद न देता डॉ. भागवत कराड यांना मंत्री पद देऊन फोडा झोडा राज्य करा ही ब्रिटिश निती वापरली. यावेळी पुन्हा विधान परिषदेत कात्रज घाट दाखवत पुनर्वसनापासुन दुर ठेऊन पुन्हा पंख कापण्याचे काम केले. विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री या पदाच्या शर्यतीत असलेल्या ओबीसी, महीला, ऊसतोड मजुरांच्या नेत्या, जनतेच्या मनात अढळ विश्वास असणाऱ्या ताकतवान लोकनेत्याला नमोहरम करण्याची एकही संधी फडणवीस सोडत नाहीत. चंद्रकांत दादा त्यांच्याच ताटाखालचे मांजर असल्यामुळे ते ही काही बोलू शकत नाही. आणि काही बोलले तर त्यांचेच प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात येऊ शकते.
यापुढे आशा काही कपटनिती पुन्हा अवलंबल्या जाऊ शकतात. आत्ता येणाऱ्या निवडणुका २०२४लोकसभा आहेत. यासाठी पंकजाताईना बीड मतदार संघ दिला जाऊ शकतो. यामुळे त्या महाराष्ट्रातील राजकारणापासून दूर जाऊ शकतात. आणि दुसरे परळी विधान सभा ही जागा मोकळी होऊ शकते. या ठिकाणी प्रीतम ताईंना उमेदवारी न देता मुंढे व्यतिरिक्त अन्य चेहरा पुढे आणला जाऊ शकतो. यामुळे मुंढे घरण्याचे आणखी एक पंख कायमचे कापले जाऊ शकते. हा प्लॅन यशस्वी झाला नाही तर २०२४विधानसभा तिकीट देऊन पुन्हा तिथून पडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. इतर ठिकाणी त्यांना मानणारा वर्ग भाजपच्या मागे राहील व परळी मध्ये ताईंचा करेक्ट कार्यक्रम करण्याची कपटनिती वापरली जाऊ शकते.