राजमार्ग क्र.१२४मधील दहिवडी-वडूज रस्त्याची पिंगळी-मांडवे गावादरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.
या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जणू तारेवरची कसरत करावी लागत आहे.या धोकादायक खड्ड्यांमुळे या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे.तरी हे खड्डे बुजवण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते सचिन काटकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जर हे खड्डे बुजवले नाहीत.तर रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करु असा इशारा त्यांनी दिला.
निवेदनात असे म्हटले आहे की,राजमार्ग क्र.१२४ मधील दहिवडी-वडूज रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम उपविभाग दहिवडी यांचे अखत्यारीत येत असलेल्या दहिवडी ते पिंगळी या दरम्यानही रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
सदर खड्डे बुजवण्याविषयी सार्वजनिक बांधकाय उपविभागाच्या अधिकार्यांना वेळोवेळी फोन करून कळवून देखील अधिकार्यांनी या गोष्टींकडे कानाडोळा केला आहे.या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार जायबंदी झाले आहेत,काही अपघातग्रस्त प्रावाशांना उपचारादरम्यान आपल्या जीवास मुकावे लागले आहे.या बाबी लक्षात घेत लवकरात लवकर सदर खड्डे बुजवण्यात यावे,अशी मागणी त्यांनी केली.







