लोकन्यायालया पक्षकारांनी लाभ घ्यावा -न्यायाधीश आर,व्ही.हुददर
म्हसवड,ता.9: उच्च न्यायालय अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी ( ता.13) सकाळी दहा वाजता लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असुन याचा पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन खटाव तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश आर.व्ही.हुददार यांनी केले आहे.
न्यायालयात असणारे दिवाणी दावे,दाखल पुर्व प्रकरणे,बँक कर्ज व चेक बाबतची प्रकरणे,ग्राम पंचायत ,नगरपंचायत,नगरपरिषद थकबाकी प्रकरणे, घरगुती वाद,पोटगी प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी इत्यादी प्रकरणे आपआपसात तडजोड करण्यासाठी लोकन्यायालयात उपस्थित राहावे,पक्षकारांनी न्यायालयात दाखल व दाखल पुर्व असलेली प्रकरणे लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपआपसात तडजोड करुन घ्यावीत तसेच न्यायालयात येताना कोरोना साथीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन न्यायाधीश आर,व्ही.हुददार यांनी पक्षकारांना केले आहे.







