माजी आ.सनमडीकर यांच्या कुटुंबियांचे मंत्री विश्वजित कदम यांनी केले सांत्वन!
माणगंगा न्यूज जत:-जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी सनमडीकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी बोलताना सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचा जत तालुक्यात कॉँग्रेस पक्ष वाढवण्यात सिंहाचा वाटा होता. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. कदम घराण्याबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी डॉ. कैलास सनमडीकर, डॉ. वैशाली सनमडीकर, नात अपूर्वा व अनुष्क, विजय सनमडीकर, आमदार विक्रम सावंत, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, जत शहर काँग्रेसचे अध्यक्ष भूपेंद्र कांबळे, रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, विक्रम फाउंडेशनचे अॅड. युवराज निकम, नाना शिंदे, परशुराम मोरे, गणेश गिड्डे, काका शिंदे उपस्थित होते.