ईझी सातारा हे अँप सातारा जिल्हयाच्या डिजीटल परंपरेमध्ये क्रांती घडवेल :- उदयनराजे भोसले
मायणी :- दत्ता कोळी
ईझी सातारा अँप सातारा जिल्ह्याच्या डिजिटल परंपरेमध्ये क्रांती घडवेल असा विश्वास श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी ईझी सातारा या वेबसाईट व अँपच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला . हे ऑनलाईनअँप श्री . खा . छ . उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सातारा येथे कार्यान्वित करण्यात आले आहे .
ईझी सातारा या स्थानिक गणेशोत्सव अँपची निर्मिती सेवा इन्फोटेक व ईझी सातारा ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आली असून सातारकरांना एका क्लिकवर ऑनलाईन गणेशदर्शन होणार आहे . कोरोना व इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता . शहरातील नागरीकांना गणेशोत्सव घरी बसून मोफत ऑनलाईन दर्शन मिळणार आहे . संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी होणार नाही . याकडे विशेष लक्ष दयावे लागणार आहे . यासाठी घरबसल्या गणेश दर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .
यासाठी सातारा शहरातील गणेश मंडळांनी EZY Satara अॅप व www.ezysatara.com या संकेत स्थळावर माहिती अपलोड करावयाची आहे . सातारा शहरामध्ये घरगुती आरास देखावे मोठया प्रमाणात केले जातात . यामध्ये घरगुती आरासचे देखावेही अपलोड करता येणार आहेत . या अँपच्या माध्यमातून ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत थेट तरुण मंडळांना या वेबसाईटवर दैनंदिन कार्यक्रमांचे अपडेटसूही शेयर करता येतील . हा सातारचा गणेशोत्सव डीजीटल माध्यमातून एकत्रीत व्हावा यासाठी ईझी सातारा या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे .
सेवा इन्फोटेक व ईझी सातारा ग्रुपचे सदस्य जयराज चव्हाण धनंजय पवार , अजय देशमुख ,आबासाहेब महामुनी , निलेश मोरे यांनी या अँपची निर्मिती केली आहे . यावर सार्वजनिक मंडळांना स्वतःचे प्रोफाईल तयार करता येईल त्यावर मंडळांच्या स्थापनेपासूनच्या माहितीसह उत्सवाची माहिती , मंडळाचे उपक्रम या माहितीसह फोटो अपलोड करता येतील शिवाय हे प्रोफाईल फेसबुक , व्टिटर , व्हॉटस अप , इन्स्टाग्राम सह विविध सोशल मिडीयाच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करता येईल . आज साताऱ्याचे अनेक नागरीक जगाच्या कानाकोपऱ्यात वास्तव्य करीत आहेत . त्यांना घरच्या गणेशोत्सवाची ओढ असते . या मध्यमातून आपल्या सातारा शहराचा गणेशोत्सव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल .
सार्वजनिक मंडळांना डिजीटल पध्दतीने जोडण्याचा हा प्रयत्न आहे . त्यांना गणेशोत्सव काळामध्ये आरतीच्या वेळापासून विविध शिबीरे , कार्यक्रम यांचीही माहिती देता येईल अशी सोय अँप वेबसाईटच्या माध्यमातून केली आहे . उत्सव अधिकाधिक पध्दतीने जोडण्याचे प्रयत्न आहेत .
गणेशोत्सवातील उपक्रमांवर ऑनलाईन अभिप्राय दया . • ईझी सातारा ॲपमध्ये मंडळांच्या माहितीसोबत देखावे , उपक्रमासंदर्भात अभिप्राय नोंदविण्याची सुविधा आहे . याद्वारे मंडळाचे देखावे , गणेशमुर्ती , विधायक उपक्रमासंदर्भात योग्य ते अभिप्राय नोंदवण्यात येणार आहेत . यामध्ये लोकसहभाग फार महत्वाचा आहे . त्यातून विधायक कार्य करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन मिळणार आहे . त्यासाठी हे अँप पाहणाऱ्यांनी आपले अभिप्राय द्यावेत असे आवाहन ईझी सातारा टीमने केले आहे .







