वृक्षांचा लहान मुला प्रमाणे साभाळ -प्रांतधिकारी शैलेश सुर्यवंशी
म्हसवड : वृक्ष लागवड करा,परंतु: लागवड केलेल्या वृक्षांचा लहान मुला प्रमाणे साभाळ केला तर ते तुम्हास सावली व ऑक्सिजनही देतील असे प्रतिपादन माण -खटावचे प्रांतधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी केले.
काळेवाडी ( ता.माण ) येथे राबविण्यात आलेल्या ‘बळीराजासोबत एक दिवस ‘ या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांसह ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना श्री सुर्यवंशी बोलत होते.
यावेळी अष्टभुजा फौंडेशन च्या अध्यक्षा सौ.विदया निकाळजे,भाटकी येथील प्रगतशिल शेतकरी गोरख शिर्के,हरित वसुंधरा टीम दहिवडीचे सदस्य नंदकुमार खोत,कारंडे काका,दहिवडी येथील आर्ट ऑफ लिविंगचे सदस्य उपस्थित होते.
श्री सुर्यवंशी पुढे म्हणाले शेतक-यांसाठी शासनाच्या विविध योजना असुन त्याचा लाभ घ्यावा.
यावेळी प्रगतशील शेतकरी गोरख शिर्के यांनी आपले मनोगत म्हणाले की, ‘आताच्या पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यावर भर दिला पाहिजे. भांडवल ही शेतीची मुख्य गरज आहे योग्य व्यवस्थापन केल्यास सामान्य शेतकरी सुद्धा कुशल शेती करू शकतो.
या कार्यक्रमात शेतीविषयक कुशलपूर्ण प्रयोग करून यशस्वीरित्या शेतीच्या उत्पादनात यश मिळविलेल्या शेतकरी बांधवांचा प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.







