बीड येथे राज्यस्तरीय सेपक टकराची ३२ वी महिला व पुरुष २०२२-२३ ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेमध्ये सोलापुरच्या संघाने दमदार खेळ करत विजेतेपदाला गवसनी घालून उत्तुंग यश संपादन केले.
सातारा विरुध्द सोलापुर संघामध्ये विजेतेपद सोलापूर तर उपविजेतेपद पारितोषिक सातारच्या महिला गटाने मिळवले.याचा दैनंदिन सराव दहिवडी काॅलेजमध्ये केला.
सातारा जिल्ह्यातील माण तालुका दुष्काळग्रस्तांचा तालुका म्हणून सर्वश्रुत आहे.आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांचे मुळ गाव याचं तालुक्यातील मोही.त्यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपले नाव जगाच्या नकाशावर कोरले.
याच माणमध्ये पाण्याचा दुष्काळ असला तरी,बुध्दी,खेळाडू व अधिकाऱ्यांचा सुकाळ असल्याचे पहावयास मिळते.जिल्ह्यात सर्वाधिक अधिकारी याच माणमध्ये आहेत.या तालुक्यातीलच ग्रामीण भागातील महिलांच्या सातारा संघाने उपविजेतेपदाला गवसनी घातली.
या संघामध्ये अपेक्षा दडस,मृणाल कुलकर्णी ,आदिती जगदाळे,साक्षी जाधव,चक्षुता कदम,साक्षी केंगार,विदया चोरमले,रिध्दी केंगार,कोमल शिंदे,प्रणाली कदम यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाला उपविजेतेपद मिळवले.
यासर्व विजेत्यांचे आमदार जयकुमार गोरे,नगराध्यक्ष सागर पोळ,प्राचार्य डाॅ.एस.टी.साळुंखे,उपप्राचार्य डाॅ.ए.जे.बरकडे,डाॅ.ए.एन.दडस,क्रीडाशिक्षक अमर जाधव,विक्रम लांडगे,धिरेनकुमार भोसले यांनी अभिनंदन केले.
या खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून श्री.चंद्रकांत भोईटे यांनी काम पाहिले.







