जतमध्ये इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम
माणगंगा न्यूज जत:-
इंधन दरवाढीच्या विरोधात जत तालुका युवक काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार मोहनराव कदम यांनी केले. यावेळी आमदार विक्रमदादा सावंत, काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे, माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे, युवा नेते राजेंद्र जेऊर,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास माने, जत शहराध्यक्ष आकाश बनसोडे, योगेश बामणे, रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, रामपूरचे ग्रा. सदस्य रमेश कोळेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई पाच्छापुरे, रावसाहेब मंगसुळी, गंगाधर कलाल, सनी महाजन , सतीश कलाल, मिथुन माने,पिंटू व्हनमाने, गणेश गिड्डे,गटनेते साहेबराव कोळी, राजू यादव, काका शिंदे, परशुराम कलाल, सईसाब टपाले, फिरोज नदाफ,आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार मोहनशेठ कदम म्हणाले की, केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज इंधन दरवाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. इंधन दरवाढ कमी न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. केंद्रात मोदींचे शासन आल्यापासून सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.