सौ.गौरी उर्फ प्राजक्ता शुभम पोरे/राजेमाने यांचे विधी वकीली पदवी परिक्षेत यश
म्हसवड: म्हसवड येथील शुभम ग्रूप ऑफ बीजनेसचे सर्वेसर्वा इंजि.सुनील पोरे व शुभम भारत गॅस एजन्सीच्या संचालिका सौ.सुवर्णा पोरे यांची स्नुषा व ॲड.शुभम पोरे यांच्या पत्नी सौ.गौरी उर्फ प्राजक्ता शुभम पोरे/राजेमाने यांनी नुकतेच विधी अभ्यासक्रम (वकिली परीक्षा) लागलेल्या निकाल मध्ये विशेष प्रावीण्य श्रेणीतील गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. सातारा येथील ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज च्या त्या विद्यार्थिनी आहेत.
त्यांचे या यशाबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,आमदार जयकुमार गोरे,मा.आमदार सदाशिव सपकाळ,ज्येष्ठ विधिज्ञ ॲड शरदचंद्र भोसले, दै.पढारीचे सह.संपादक डहरिश पाटणे आदिनी या यशाबद्दल अभिनंदन केले.







