हिंगणगादे येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या अकरा वर्षीय मुलाचा अखेर मृतदेह सापडला
हिंगणगादे तालुका खानापूर येथील सोहम नितीन पवार वय वर्ष 11 हा शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान सायकल वरून जात असताना ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता या घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना दिली त्यांनी आयुष हेल्पलाइन टीमला ही माहिती देण्यात आली ही टीम रविवारी सकाळी साडेसहा वाजता दाखल होऊन शोधमोहीम सुरू केली असता साधारणपणे साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोहमचा पाण्यामध्ये मृतदेह मिळाला सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा येथील शासकीय दवाखान्यामध्ये दाखल केला आहे







