लॉकडाऊन निर्बंध ताबडतोब हाटवा
अन्यथा, 22 जुलै रोजी रस्तारोको आंदोलन.
वंचित बहुजन आघाडी
सांगली ;
कोरोना विषाणू मुळे संपुर्ण देशामध्ये वेळोवेळी लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. गेले दीड दोनवर्षांपासून कोणत्याही प्रकारचे आर्थिक तथा कामधंदा,सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू नाहीत अशातच पेट्रोल, डिझेल, डाळी,खाद्यतेल, गॅस,जीवनावश्यक वस्तू इ……चे किमतीत भरमसाठ वाढ रोज होतच आहे
यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडत आहे. लोकांचा उत्पन्नच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने खर्च हा मोठ्या प्रमाणावर होत आहे. हातावर पोट असणाऱ्याना लॉकडाउन मुळे सर्वच कामधंदा पूर्णता बंद असल्याने एक वेळचे अन्न पण लोकांना मिळत नाही यामुळे जीवन जगणे असहाय्य झाले आहे. लोक कोरोनामुळे नाही तर उपासमारीने अधिक मरत आहेत हाताला काम नसल्याने रोजगार नाही यामुळे घरखर्च चालवणे कठीण झाल्याने सर्व सामान्य माणूस व शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे,आर्थिक परिस्थिती फार बिकट बनलेली आहे.तीन चार महिन्यांपासून बाजार पेठ तसेच लघु उद्योग बंद आहेत.त्यांमुळे छोटे मोठे व्यापारी, उद्योजक आणि गोरगरिब श्रमिक नागरिक हे लॉकडाऊनमुळे फार अडचणीत आलेले आहेत
.त्यांमुळे वंचित बहुजन आघाडी,सांगली जिल्ह्या मार्फत या आधी देखील शुक्रवार दि. १६ जुलै २०२१ रोजी मा. जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात आले होते कि आज दिनांक १९ जुलै नंतर कडक लॉकडाऊन निर्बंध लावून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले तर आम्ही जनआंदोलन उभा करून शासन व प्रशासनाच्या विरोधात उभे राहून नागरिक , छोटे मोठे व्यवसायिकांना दिलासा मिळेपर्यंत आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून लढा देऊ
तरी या विषयावर अद्याप स्पष्ट निर्णय घेण्यात आला नाही. सदर विषयात चाल ढकल करून जनतेस त्रास दिला जात आहे.निर्बंधाचे निर्णय घेण्यात जेवढी गडबड केली जात असत तेवढीच सुस्त प्रकिया निर्बंध हटविण्यात होताना दिसत आहे तरी येणाऱ्या दिवसात कडक लॉक डाऊन निर्बंध लादले गेल्यास वंचित बहुजन आघाडीकडून दिनांक २२ जुलै २०२१ रोजी सांगली-मिरज रस्त्यावर रस्तारोको करत तीव्र आंदोलन करेल. सदर घटनेस शासन व प्रशासन जबाबदार राहतील.असा इशारा वंचित बहुजन आघाडी मार्फत मा.जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या द्वारे शासनाला देण्यात आहे.
यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक संजय कांबळे, मनपा क्षेत्र अध्यक्ष प्रशांत कदम,प्रशांत वाघमारे,प्रशांत लोंढे,वसंत भोसले, अनिल अंकल खोपे, कुमार कांबळे, अनिल मोरे,दीक्षांत सावंत, मिलिंद कांबळे, सागर आठवले, सिध्दार्थ लोंढे, शरद वाघमारे,ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.