म्हसवड यात्रेसाठी प्रशासन सज्ज.
म्हसवड (प्रतिनिधी)
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा दिनांक 24 नोव्हेंबर रोजी होणार असून या यात्रेसाठी मंदिर प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे.
म्हसवड शहराच्या रिंगावण पेठ परिसरामध्ये पारंपारिक पद्धतीने श्री सिद्धनाथ यात्रा भरके या दिवशी श्री सिद्धनाथाची मसवड येथील रिंगण पेठेतून परत यात्रा प्रारंभ होते यावेळी लाल खूप भाविक उपस्थित असतात गेली दोन वर्ष कोरोनामुळे ही यात्रा भरलेली नव्हती.
मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरणार असल्याचे यात्रा समितीतर्फे सांगण्यात आलेले आहे यात्रेसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज असून पोलीस यंत्रणेने म्हसवड- शहरांमध्ये ठिकठिकाणी निरीक्षण करण्यासाठी पोलीस सज्ज केली असून सुमारे दीडशे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले असून होमगार्ड व स्थानिक स्वयंसेवी संस्था आहे यांना यात्रा नियोजनासाठी सज्ज करण्यात आलेला आहे म्हसवड पेठ यात्रेमध्ये विविध भागातून दुकाने थाटण्यात आले असून मिठाई खेळणी व विविध प्रकारच्या वस्तू विक्रीचे दुकाने लावण्यात आलेली आहेत सुमारे तीन ते साडेतीन लाख भाविक या यात्रेसाठी उपस्थित असतात .
यात्रेकरूंची सोय करण्यासाठी म्हसवड- नगरपालिका सज्ज झाले असून नगरपालिकेने यात्रेकरूंच्या सुविधा विविध ठिकाणी मंडप उभा करून वीज पाणी व आरोग्यव्यवस्था तैनात केलेली आहे .
म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने यात्रा परिसरामध्ये आरोग्य तपासणी शिबिर व आरोग्य चिकित्सा शिबीर उभा करण्यात आलेला आहे तर स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने यात्रा काळामध्ये यात्रेकरूंच्या सुविधा केंद्राची व्यवस्था केलेली आहे यात्रा काळामध्ये गर्दी होऊ नये यासाठी मसवड पोलिसांनी परत मार्ग परिसरामध्ये नो पार्किंग झोन केला असून शहराच्या बाहेर वाहन तळ उभा करण्यात आलेले आहेत.
शहराभोवती असणाऱ्या चार ठिकाणी वाहन तळाशी उभारणी करण्यात असून येथे यात्रे करूनी वाहने उभी करावीत असे आवाहन पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी केले आहे.
म्हसवड नगरपालिकेने ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करून यात्रेकरूंना पाणी उपलब्ध करून दिले आहे म्हसवड- नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन माने स्वतः प्रयत्न करत असून स्वच्छता व आरोग्य याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे वीज मंडळाने यात्रा काळामध्ये वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज केली असून शहरातील वीजतारांची दुरुस्ती नुकतीच केलेली आहे पाणीपुरवठा विभागाकडून शहरांमध्ये ठिकठिकाणी पाण्यासाठी सोय केलेली आहे.
रिंगावन पेठ परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली असून रथमार्ग डांबरीकरण करण्यात आलेले आहे.
माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून म्हसवड- रथमार्ग डांबरीकरण करण्यात आले असून सुमारे 65 लाख रुपये खर्चाचा वडजाई ओढा ते रिंगावण पेठ हा रस्ता दुरुस्त करण्यात आलेला आहे माण नदीच्या पात्रामध्ये पाणी साठल्यामुळे यावर्षी म्हसवड यात्रा बाजार पटांगण व रिंगावन पेठ येथे भरणार असून यात्रेसाठी भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन म्हसवड- पोलीस स्टेशन व सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केली असून यात्रा काळामध्ये चोऱ्या रोखण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले असून साध्या वेशातील पोलीस कर्मचारी यात्रेमध्ये नियुक्त करण्यात आलेले आहेत
यात्रा परिसरामध्ये पोलीस कक्ष स्वतंत्र करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या तक्रारी व सूचना या पोलीस मदत केंद्रामध्ये कराव्यात असे आवाहन म्हसवड- पोलिसांनी केले आहे. सातारा जिल्हा वाहतूक नियंत्रण व सातारा परिवहन महामंडळ यांच्या वतीने जादा बसेस सोडण्यात येणार असून स्वतंत्र बस स्थानक व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी खाजगी वाहनातून
प्रवास करू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे करण्यात आलेला आहे.







