बीटस्तर क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा मायणी मुली,व मुले विद्यार्थ्यांचे यश
मायणी ,ता . खटाव येथे घेण्यात आलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बीटस्तर क्रीडा स्पर्धेमध्ये येथील जिल्हा परिषद शाळा मुले व मुली यांच्या संघाने यश प्राप्त केले . मायणी बिटाअंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटामध्ये राजवीर कोरडे 100 मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक , 400 मीटर धावण्यात रितेश यलमर आणि नितेश कचरे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला . श्रेयश यादव व मानस माने यांनी 600 मीटर धावण्यात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक , रितेश यलमर याने लांब उडीत तृतीय क्रमांक पटकावला . प्रणित निकम याने बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला . सांघिक स्पर्धेमध्ये रस्सीखेच व लंगडी या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला .
तर मुलींमध्ये 60 मीटर धावणे मध्ये श्रेया पाटोळे तृतीय क्रमांक , 200 मी . धावणे सृष्टी जाधव तृतीय क्रमांक , 400 मी धावणे दिव्या मोहिते प्रथम क्रमांक , लांबउडी प्रतिक्षा पावरा तृतीय क्रमांक . बुद्धिबळ स्पर्धेत श्रेया गरवारे व मंजिरी तावरे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला .
तसेच मुलींमध्ये रस्सीखेच प्रथम क्रमांक प्राप्त केला .
वरील सर्व विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . मुख्याध्यापिका उमा वडगांवकर , वनिता कुलकर्णी ,क्रीडाशिक्षक रामचंद्र जगताप , मैथिली देशपांडे , विजया सणगर , रमेश शेडगे , भागवत कोनाळे यांचे मार्गदर्शन लाभले .







