म्हसवड येथील प्रसिद्ध किराणा मालाचे होलसेल व्यापारी सुरेश मोडासे यांचे निधन
म्हसवड (प्रतिनिधी)
दुःखद निधन म्हसवड येथील प्रतिष्ठित किराणा होलसेल व्यापारी , म्हसवड येथील जैन समाजाचे लोकप्रिय व्यक्तीमत्व सुरेश पवनलाल मोडासे यांचे काल रात्री ८वाजता दुःखद निधन झालेलं आहे.
त्यांच्या पाठीमागे एक मुलगा मुलगी असून दोन भाऊ पाच बहिणी असा परिवार आहे म्हसवड येथील किराणाचे होलसेल व्यापारी सुरेश पवनलाल मुडासे गेल्या तीन वर्षापासून कर्करोगानी आजारी होते अत्यंत धाडसाणने कर्करोगाशी सामना करीत त्यांनी तीन वर्ष कर्करोगाशी झुंज दिली मात्र काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
मृत्यू समयी जैन मुनी यांनी त्यांना नमोकार महा मंत्राचा छाप दिला,
सुरेश मोडासे अत्यंत धार्मिक होते. विविध जैन तीर्थस्थळाच्या यातल्या करून मोठ्या देणग्या दिल्या आहेत.
अनेक वर्षे ते छ घाला स्तोत्र पठण करत होते.
त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. म्हसवड व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
म्हसवड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.







