भोर : माण ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व सदस्य संदीप साठे यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने मुळशी तालुक्यात धक्कातंत्र वापरत पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदिप साठे यांचा काँग्रेस प्रवेश करून घेतल्याने मुळशीत चर्चांना उधाण आले आहे. तर प्रवेश करताच साठे यांना युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पद दिले आहे.
संदीप साठे हे माण आयटीनगरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य आहेत. माण ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचेच वर्चस्व आहे. त्यामुळे साठे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला धक्का द्यायचा काँग्रेसने शतशः प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. साठे यांच्यासोबतच त्यांचे सहकारी अक्षय भोईर, सचिन शितोळे, राकेश पाटील, प्रसाद कुलकर्णी, स्वप्निल साठे , निलेश पवार यांनी प्रवेश केल्याची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी दिली.
या पक्ष प्रवेशावेळी मुळशी काँग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे, कार्याध्यक्ष सुरेश पारखी, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दादाराम मांडेकर, शिवाजी बुचडे, माजी भोर विधानसभा युवक अध्यक्ष राहुल जाधव, पिंपळोली सरपंच मोरेश्वर घारे, अविनाश खानेकर, संतोष घारे, माजी चेअरमन साहेबराव जाधव, हिंजवडी ग्रामपंचायत सदस्य शरद जांभुळकर, बंटी भुरुक आदी मान्यवर उपस्थित होते.







